शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

नगर तालुक्यात रंगणार दुरंगी लढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:17 IST

केडगाव : आगामी वर्षात जिल्हा बँक, बाजार समिती व सेवा सोसायट्यांच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर होत असलेल्या ग्रामपंचायत ...

केडगाव : आगामी वर्षात जिल्हा बँक, बाजार समिती व सेवा सोसायट्यांच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. वास्तविक पाहता भाजपाचे नेते शिवाजी कर्डिले यांनी निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच या निवडणुकांसाठी मशागत केली. नव्या जुन्यांचा ताळमेळ घालत एकत्रिकरण केले. महाविकास आघाडीनेही कर्डिले यांच्याविरोधात दंड थोपटत मोठे आव्हान दिले आहे. जवळपास सर्वच गावात दुरंगी लढती रंगणार आहेत. तालुका पातळीवरील राजकीय संघर्षाचे पडसाद आता थेट गावात दिसू लागले आहेत.

नगर तालुक्यातील ५९ गावांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. भाजप नेते माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या गटाच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने मोट आवळत महाविकास आघाडी मैदानात उतरविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे तालुका पातळीवर रंगणारे राजकीय युध्द थेट गावाच्या निवडणुकीत उतरू पाहत आहे. दोन्ही गटाकडून गावची सत्ता ताब्यात घेण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. कर्डिले यांनी ग्रामपंचायत निवडणुकीबरोबरच आगामी सेवा संस्था, जिल्हा बँक, बाजार समितीच्या निवडणुकीसाठी गावोगावी दौरा करुन नव्या-जुन्यांचा मेळ घातला. दुरावलेले कार्यकर्ते पुन्हा एका छताखाली आणण्याचा प्रयत्न केला. सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, भाजप तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, माजी तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग, रेवन चोभे, दीपक कार्ले, रविंद्र कडूस यांच्या माध्यमातून निवडणुकीसाठी तालुक्यात साखर पेरणीचे काम सुरु आहे. तेही गावोगावच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम करत आहेत.

दिवंगत नेते माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्या अनुपस्थितीत महाआघाडी प्रथमच निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यामुळे आता शिवसेनेसोबत कॉग्रेस व राष्ट्रवादीला एकत्र आणण्यात जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी पुढाकार घेत तीन पक्षांची मोट बांधत आघाडीचे नेतृत्व हाती घेतले आहे. कॉग्रेसकडून प्रताप शेळके, बाळासाहेब हराळ, संपतराव म्हस्के पक्षाची धुरा सांभाळत असले तरी त्यांना त्यांच्याच गावात वेळ द्यावा लागणार आहे .

-------------

‘ते’ नेते कर्डिले, गाडेंच्याही बैठकीला हजर

भाजपा व महाविकास आघाडीच्या गावोगावी बैठका सुरु आहेत. परंतु, गावपातळीवरील काही स्वयंघोषित पुढारी भाजपा नेते कर्डिले यांच्याबरोबरच आघाडीचे नेते गाडे यांच्या बैठकीलाही हजेरी लावत आहेत. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

--------------

युवकांचा तिसर्‍या आघाडीकडे कल

जुन्या प्रस्तापिंताना बाजूला सारण्यासाठी तरुणाई तिसरी आघाडी करण्याच्या विचाराधीन आहे. आरपारचा नारा देत तिसरी आघाडी करायचीच, असे जाहीर आव्हानही दिले जात आहे. परंतु, तिसर्‍या आघाडीला मिळणारी रसद कोणाची? त्यांना गावात कोण मदत करतेय? याकडे गावची नेतेमंडळी लक्ष ठेवून आहेत.

--------------

राष्ट्रवादी अर्धी कर्डिलेंसोबत !

गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून नगर तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समितीच्या निवडणुका या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडी करुन लढविल्या जातात. नगर तालुका महाविकास आघाडीला भाजपाचे नेते शिवाजी कर्डिले यांचेच मोठे आव्हान असते. या निवडणुकीतही कर्डिले विरोधात महाविकास आघाडी एकवटली आहे. परंतु, असे असले तरी नगर तालुक्यातील अर्धी राष्ट्रवादी कर्डिलेंसोबत, तर अर्धी राष्ट्रवादी महाविकास आघाडीसोबत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

-----------

शिवसेना एकसंघ

जिल्हाप्रमुख प्रा. गाडे यांनी नगर तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये बारकाईने लक्ष घातले आहे. तालुका प्रमुख राजेंद्र भगत यांनी शिवसेना सभासद नोंदणी अभियान गावोगावी राबवून तालुक्यातील शिवसेना जागृत करण्याचे काम केले. जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, सभापती प्रविण कोकाटे, गोविंद मोकाटे यांनीही या निवडणुकांमध्ये एकीने लक्ष घातले आहे .