शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
2
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुडवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
5
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
6
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
7
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
8
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
9
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
10
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
11
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
12
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
13
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
14
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
15
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर
16
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
17
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
18
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
19
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
20
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

भंडारदऱ्यात दोन टीएमसी पाणी

By admin | Updated: July 20, 2014 00:23 IST

अकोले: सलग पाचव्या दिवशी घाटघर व हरिश्चंद्रगड परिसरात जोरदार पाऊस बरसत असून, शुक्रवारी रतनवाडी येथे साडेसात इंच पाऊस पडला.

अकोले: सलग पाचव्या दिवशी घाटघर व हरिश्चंद्रगड परिसरात जोरदार पाऊस बरसत असून, शुक्रवारी रतनवाडी येथे साडेसात इंच पाऊस पडला. भंडारदरा धरणातील पाणी साठ्याने आता दोन दशलक्ष घनफुटाची पातळी ओलाडली आहे. घाटघरला १००, तर रतनवाडीला १८० मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली असून गेल्या २४ तासांत अर्धा टी.एम.सी. नव्या पाण्याची आवक भंडारदरा जलाशयात झाली आहे. पश्चिम आदिवासी भागात पावसाची संततधार सुरु असून पूर्व भागातही पावसाचा जोर वाढला आहे. भंडारदरा धरणात शुक्रवारी झालेल्या पावसाने २४ तासांत ५१३ दशलक्ष घनफूट नव्या पाण्याची आवक झाली आहे. शुक्रवारचा पाऊस व कंसात यावर्षी पडलेला एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये - घाटघर- १०० (९८९), रतनवाडी- १८० (८९९), पांजरे- ६९ (४४२), वाकी- ८५ (३०८), भंडारदरा- ७० (३३१), कोतूळ ६ (४४), निळवंडे- १० (५८), आढळा- २ (१२), अकोले- ३ (१०) पाऊस पडला. अकोले, इंदोरी परिसरात शनिवारी दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. भंडारदरा धरणात १ हजार ९८३, तर निळवंडेत ३३४ दलघफू साठा शुक्रवार सकाळीपर्यंत होता. आंबीत तलाव ओसंडून वाहत असून हरिश्चंद्रगड परिसरात पावसाचा जोर वाढल्याने मुळानदी पात्रातून ४ हजार २२७ क्युसेक वेगाने विसर्ग सुरु आहे. (तालुका प्रतिनिधी)मुळा’ चा साठा पाच हजारावर मुळा पाणलोट क्षेत्रातील हरिश्चंद्र गड परिसरात पाऊस कोसळत असल्याने दोन दिवसात मुळा धरणात आठशे दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. त्यामुळे धरणाचा एकूण साठा ५ हजार ७३१ दशलक्ष घनफूट झाला आहे.