शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी ट्रेलरवर आदळून दोन जागीच ठार

By admin | Updated: April 29, 2016 23:24 IST

मिरजगाव : नगर-सोलापूर महामार्गावर मिरजगाव नजीकच्या बेलगाव चौकात मोटारसायकल ट्रॅक्टरच्या ट्रेलरवर पाठीमागून आदळून झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोन तरुण जागीच ठार झाले.

मिरजगाव : नगर-सोलापूर महामार्गावर मिरजगाव नजीकच्या बेलगाव चौकात मोटारसायकल ट्रॅक्टरच्या ट्रेलरवर पाठीमागून आदळून झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोन तरुण जागीच ठार झाले. गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. दोन्ही मयत मिरजगाव येथील आहेत.बेलगाव चौकातील भुईकाट्यावरून ऊस वाढ्याचे वजन करून हा ट्रॅक्टर ट्रेलरसह मिरजगावकडे येत होता. यावेळी नगरकडून मिरजगावकडे विना नंबरच्या मोटारसायकलवरून दत्ता शाम अंदुरे (वय २९) व सागर प्रकाश कळसकर (वय २३) येत असताना समोरील वाहनाच्या तीव्र प्रकाशाने पुढे चाललेला ट्रॅक्टर न दिसल्याने मोटारसायकल जोराने ट्रॅक्टरवर आदळली. यात दोघांच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने दोघे जागीच ठार झाले. अपघातस्थळापासून हाकेच्या अंतरावर पोलीस दूरक्षेत्र आहे. पो. हे. कॉ. सुरेश बाबर, दत्ता कासार, नृसिंह शेलार, हृदय घोडके यांनी विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रात्री एकच्या दरम्यान कर्जतला पाठविले.दत्ता अंदुरे भांड्याचे व्यापारी शाम अंदुरे यांचा मुलगा आहे तर सागर कळसाईत पंढरपूर येथील टोलनाक्यावरील कर्मचारी प्रकाश कळसाईत यांचा मुलगा आहे. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळी ट्रॅक्टर सोडून पळून गेला. पोलिसांनी ट्रॅक्टर ताब्यात घेतला असून गुन्हा नोंदविण्याचे काम चालू होते. (वार्ताहर)शवविच्छेदनासाठी दहा तासांची प्रतीक्षामिरजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनाची सोय आहे, परंतु यासाठी आवश्यक डॉक्टर व कर्मचारी नाही. त्यामुळे अपघातानंतर कर्जतला मृतदेह पाठवावे लागतात. रात्री ११-३० ला झालेल्या अपघातानंतर शवविच्छेदनानंतर सकाळी ११ वाजता मृतदेह नातेवाईकांना ताब्यात मिळाला. नगर-सोलापूर महामार्गावर सतत अपघात घडतात. मात्र शवविच्छेदनासाठी नातेवाईकांना मोठी प्रतीक्षा करावी लागते.