शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

दोन कुटुंबावर खुनी हल्ला; सात जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2017 17:21 IST

दोन कुटुंबांवर तलवार, हॉकी स्टीक, गज, काठीने खुनी हल्ला केला. यामध्ये सातजण जखमी झाले असून, पैकी तिघा जणांची प्रकृती गंभीर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककाष्टी : मनसेचे माजी श्रीगोंदा तालुका उपाध्यक्ष सुभाष चौधरी व त्याच्या साथीदारांनी पूर्ववैमनस्यातून शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांवर तलवार, हॉकी स्टीक, गज, काठीने खुनी हल्ला केला. यामध्ये सातजण जखमी झाले असून, पैकी तिघा जणांची प्रकृती गंभीर आहे. हल्लेखोरांनी दोन कार, ट्रॅक्टर व मोटारसायकलचीही मोडतोड केली. घटनेतील सर्व आरोपी फरार आहेत. काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील चौधरी मळ्यात ही घटना घडली. जखमींमध्ये श्रीकृष्ण काशिनाथ मखरे, अनिता श्रीकृष्ण मखरे (वय २८), पुष्कर श्रीकृष्ण मखरे (वय १०), आबासाहेब मखरे (वय २५), काशिनाथ विनायक मखरे (वय ५६), मंगल संतोष गोरे (वय ४०), इंदुबाई गोरे (वय ७५) यांचा समावेश आहे. पैकी श्रीकृष्ण मखरे, इंदुबाई गोरे व मंगल गोरे यांची प्रकृती गंभीर आहे. याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आबासाहेब काशिनाथ मखरे यांनी फिर्याद दिली. मनसेचे माजी तालुका उपाध्यक्ष सुभाष कोंडिबा चौधरी, वैशाली सुभाष चौधरी, शुभांगी सुभाष चौधरी, वैभव सुभाष चौधरी (रा. काष्टी ता. श्रीगोंदा) तर गणेश समाधान दरेकर (रा.गोपाळवाडी ता.दौंड जि.पुणे), ऋतीक लगड (रा. श्रीगोंदा), गणेश कचरे (रा. अजनूज ता. श्रीगोंदा) यांच्यासह इतर आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुभाष कोंडिबा चौधरी आणि काशिनाथ मखरे यांचा गेल्या पाच वर्षापासून न्यायालयात जमिनीचा वाद आहे. या वादातून यापूर्वी अनेकदा दोन गटात वादावादीचेही प्रकार घडले. सुभाष कोंडिबा चौधरी व त्याच्या दहा ते बारा साथीदारांनी रस्त्यावर ट्रॅक्टर आडवा लावून मखरे यांच्या गाडीवर लाकडी दांडके, गज, काठीने मारहाण करून काचा फोडल्या व श्रीकृष्ण व त्यांचा मुलगा पुष्कर याला तलवार व लोखंडी गजाने बेदम मारहाण करीत असताना घरी जाऊन वडील काशिनाथ, पत्नी अनिता, भावजय रूपाली यांना मारहाण केली़ मखरे कुटुंबाला चौधरी यांच्याकडून मारहाण होत असताना ही मारहाण सोडविण्यास गेलेल्या मंगल गोरे, इंदूबाई बापूराव गोरे या शेजाऱ्यांनाही चौधरी यांच्या गटाकडून मारहाण केली़ इंदूबाई यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जखमी केले़ आरडाओरडा झाल्याने आरोपी वाहने जागेवर सोडून उसाच्या शेतातून पसार झाले.घटनेनंतर सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. इंदूबाई गोरे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुणे येथे हलविण्यात आले. मंगल गोरे दौंड येथे उपचार घेत आहेत. श्रीकृष्ण मखरे नगर येथे उपचार घेत आहेत. त्यांच्या डोक्यावर तलवारीचे मोठे वार आहेत. पोलीस दोन तासांनी घटनास्थळी आल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. पोलीस उपनिरीक्षक नीलेश कांबळे यांना नागरिकांनी आरोपींनी वापरलेली हत्यारे, पाच वाहने दाखविली. ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.