शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

एचआरसीटी रिपोर्टसाठी दोन दिवसांचे वेटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:21 IST

रुग्णांना कोरोनाची काही लक्षणे असल्यास किंवा कोरोनामुळे रुग्णांच्या फुफ्फुसांमध्ये काही नुकसान झाले आहे का हे पाहण्यासाठी सिटीस्कॅन मशीनमधून ही ...

रुग्णांना कोरोनाची काही लक्षणे असल्यास किंवा कोरोनामुळे रुग्णांच्या फुफ्फुसांमध्ये काही नुकसान झाले आहे का हे पाहण्यासाठी सिटीस्कॅन मशीनमधून ही एचआरसीटी टेस्ट केली जाते. सध्या नगरसह जिल्ह्यात या चाचणीसाठी लोक अनावश्यक गर्दी करत आहेत. मुळात तज्ज्ञांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय या चाचण्यांचा धडाका सुरू आहे. अनेक लोक किंवा संशयित रुग्ण डॉक्टरांची कोणतीही चिठ्ठी न घेता सरळ एचआरसीटी चाचणीसाठी जातात आणि रेडिओलॉजीस्टसुद्धा कोणतीही खातरजमा न करता येईल त्याची चाचणी करतात. या चाचणीबाबत अनावश्यक भीती लोकांमध्ये पसरल्याने सिटीस्कॅन सेंटरवर मोठी गर्दी होत आहे. यातून गरजू रुग्णाला तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यातून त्याच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरमधील सर्रास सिटीस्कॅन सेंटरवर हे चित्र दिसत आहे. मोठी गर्दी असल्याने एका सेंटरवर दरदिवशी २०० ते ३०० एचआरसीटी चाचण्या होत आहेत. त्यासाठी रुग्णांची तीन ते चार तास रांगेत राहून हेळसांड होत आहे. एवढे होऊनही त्याचा रिपोर्ट लगेच मिळत नाही. अनेक सेंटरवर रिपोर्टसाठी चोवीस तासांहून अधिक वेळ लागत आहे. काही सेंटरवर दोन-दोन दिवसही रिपोर्ट दिले जात नाहीत. परिणामी रुग्णांना पुढील उपचारात अडचणी येत आहेत.

--------------------

दररोज ६० ते ७० लाखांची कमाई

एका एचआरसीटी चाचणीसाठी अडीच हजार रुपये लागतात. नगर शहरात १५ ते २० सिटीस्कॅन सेंटर आहेत. एका सेंटरवर दररोज दीडशे ते अडीचशे चाचण्या होतात. या हिशेबाने हे सेंटरचालक दिवसाला ६० ते ७० लाख रुपये कमवतात.

-----------

प्रिस्क्रिप्शनशिवाय चाचणी

सध्या एचआरसीटी चाचणी अनेक सेंटरमध्ये प्रिस्क्रिप्शनशिवाय केली जात आहे. त्यामुळे लक्षणे नसणारे रुग्णही या चाचणीसाठी गर्दी करत आहेत. यातून गरजू रुग्णांना रांगेत थांबावे लागत आहे.

-------------

एचआरसीटी करण्यासाठी सध्या मोठी गर्दी आहे. बहुतांश चाचण्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करत आहोत. आनंदऋषी रुग्णालयामध्ये शनिवार, रविवार असे दोन दिवस एचआरसीटी रिपोर्ट देण्यास उशीर झाला. इतर दिवशी मात्र असे होत नाही.

- डॉ. विनोद कटारिया, रेडिओलॉजिस्ट, आनंदऋषी हॉस्पिटल.