देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे विश्व वारकरी चिंतन संप्रदायाच्या माध्यमांतून कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी १२०० किलो धान्यरूपी मदत गोळा केली आहे.
विश्व वारकरी चिंतन संप्रदायाच्या माध्यमातून सद्गुरू बाळू मामा भक्तांनी सद्गुरू मनोहर मामांच्या मार्गदर्शनाखाली एक सामाजिक उपक्रम राबविताना गावोगावातून तांदूळ, गहू, ज्वारी, बटर जमा केले आहेत. ग्रामस्थांनीही यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. देवदैठण येथून कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी १२०० किलो धान्यरूपी मदत गोळा केली आहे. हे सर्व धान्य सामाजिक बांधीलकी म्हणून कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी पाठविले जाणार आहे. धान्य जमा करण्याचे काम माजी उपसरपंच विश्वास गुंजाळ, गोरक्षनाथ वाघमारे, उद्योजक वसंत बनकर, गोरक्षनाथ वाघमारे, विलास वाघमारे, सुभाष वाघमारे, एम. पी. बनकर, अरुण वाघमारे, अरविंद बनकर, प्रशांत वाघमारे, बाळासाहेब कोरके यांनी केले.
300721\3110img_20210730_153412.jpg
देवदैठण येथे विश्व वारकरी चिंतन संप्रदायाच्या माध्यमांतून पूरग्रस्तांसाठी १२०० किलो धान्यरूपी मदत गोळा केली आहे .