शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकचालकास लुटणाऱ्या दोघांचा अपघातात मृत्यू

By admin | Updated: April 4, 2017 15:44 IST

नगर-मनमाड रोडवरील विळद घाटात ट्रकचालकाला दुचाकी अडवी लावून त्याच्याकडील २४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या चौघांपैकी दोघांचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला.

आॅनलाईन लोकमतअहमदनगर, दि़ ४- नगर-मनमाड रोडवरील विळद घाटात ट्रकचालकाला दुचाकी अडवी लावून त्याच्याकडील २४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या चौघांपैकी दोघांचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. ट्रकचालकाचा चोरीस गेलेला माल अपघातात मय झालेल्या दोघांकडे आढळून आल्याने हे तेच चोरटे असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.गणेश बाळासाहेब काळे (वय १८ रा़ देहरे), असे अपघातात मयत झालेल्यापेकी एकाचे नाव आहे़ दुसऱ्या मयताबाबत पोलीस तपास करत आहेत.मंगळवारी रात्री १ वाजेच्या सुमारास खेताराम चौधरी हा परप्रांतीय ट्रकचालक मनमाडहून नगरच्या दिशेने येत असताना विळद घाट येथे चौघा जणांनी दुचाकी अडवी लावून त्याच्याकडील दोन मोबाईल व २१ हजार ७०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. या घटनेनंतर ट्रकचालकाने एमआयडीसीत फिर्याद दाखल केली़ ही घटना घडल्यानंतर विळदघाट येथे दोघांचा अपघातात मृत्यू झाल्याची खबर पोलिसांना मिळाली़ घटनास्थळी पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण व त्यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा़ ट्रकचालकाने वर्णन केलेली काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल व चोरीस गेलेले पैसे मयतांजवळ आढळून आले. चोरी केल्यानंतर पळून जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने या दोघांचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या चोरी प्रकरणातील इतर दोघे पसार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.