शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

पोलीस शोधताहेत टॉवेलात धागे-दोरे

By admin | Updated: July 6, 2014 00:17 IST

अहमदनगर: कापडबाजारातील चोरट्यांनी टॉवेलवर येऊन चोऱ्या केल्या. जाताना मात्र नवे कपडे घालून गेले. जाताना चोरट्यांनी नेसून आलेला टॉवेल दुकानाच्या मागेच टाकून पसार झाले.

अहमदनगर: कापडबाजारातील चोरट्यांनी टॉवेलवर येऊन चोऱ्या केल्या. जाताना मात्र नवे कपडे घालून गेले. जाताना चोरट्यांनी नेसून आलेला टॉवेल दुकानाच्या मागेच टाकून पसार झाले. या टॉवेलमध्येच तपासाचे धागे-दोरे शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न निष्फळ ठरला आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजमधील चोर गेले कुठे? या प्रश्नाने पोलीसही चिंताग्रस्त झाले आहेत. तिसरा दिवस उलटून गेला तरी चोरीचा तपास अद्याप लागलेला नाही.कापड बाजारातील आठ दुकानांमध्ये गुरुवारी पहाटे चोऱ्या झाल्या होत्या. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. चोरीबाबत त्यांच्याकडून कोणताही उलगडा झाला नाही. दुकानांच्या पाठीमागील भिंतीवरून चोर जसे चढले, तसेच तेथूनच ते उतरले. त्या ठिकाणी पोलिसांनी एक पांढरा टरकीशचा टॉवेल आणि एक तोडलेले कुलूप सापडले. या टॉवेलमध्येच तपासाचे धागे-दोरे सापडतील, अशी पोलिसांची खात्री होती. या टॉवेलवर कापडबाजारापासून जवळच असलेल्या एका लॉण्ड्रीचे लेबल होते. पोलिसांनी त्या लॉण्ड्रीचालकाकडे चौकशी केली. येथून पुढे कपड्यांना लावलेल्या लेबलवर मोबाईल क्रमांक टाकण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या. हा टॉवेल कुठून आला, कोणी दिला की चोरट्यांनी टॉवेलची चोरी केली, याबाबत कोणताही उलगडा झाला नाही. त्यामुळे तपासाचे धागे-दोरे तुटले. दरम्यान दोन संशयितांकडे चौकशी करूनही काहीच हाती लागले नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये टिपलेले चोर आता नेमके कुठे गेले? या प्रश्नाने पोलिसही चक्रावले आहेत. तपासाला गती न आल्याने बाजारातील व्यापारीही संतापले आहेत. (प्रतिनिधी)