शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
4
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
5
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
6
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
7
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
8
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
9
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
13
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
14
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
15
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
16
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
17
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
18
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
19
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
20
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)

जिल्ह्यात टोलचे मोल कायम

By admin | Updated: June 11, 2014 00:16 IST

अहमदनगर : सरकारने राज्यातील ४४ टोल बंद करण्याचा आदेश दिल्याने राज्यातील वाहनचालक आणि एसटी महामंडळ खुशीत आहेत. मात्र, या निर्णयाचा नगर जिल्ह्याला पुरेसा लाभ होणार नाही.

अहमदनगर : सरकारने राज्यातील ४४ टोल बंद करण्याचा आदेश दिल्याने राज्यातील वाहनचालक आणि एसटी महामंडळ खुशीत आहेत. मात्र, या निर्णयाचा नगर जिल्ह्याला पुरेसा लाभ होणार नाही. बंद केलेले नाके बंदच होते. उर्वरित नाके सुरू राहणार असल्याने वाहनचालकांना टोलसाठी मोल द्यावेच लागेल.नगरचे सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी राज्यातील टोलविरोधात मोहीम सुरू केली. २००८ मध्ये त्यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. न्यायालयाने राज्य सरकारला टोल धोरण ठरविण्याबाबत खडसावले होते. तसेच मुदत संपलेले टोलनाके बंद करण्याचा आदेश दिला होता. त्याबाबत सरकारने पूर्वीच निर्णय घेतला होता. मात्र, काल जाहीर केला. राज्य सरकारने छोट्या वाहनचालकांना टोलमाफी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तो जाहीर केला नाही, अशी माहितीही चंगेडे यांनी दिली. जामखेड रस्त्यावरील खर्ड्याचा, नगर-करमाळा रस्त्यावरील मांगी येथील तसेच दौंडजवळील टोलनाका बंद झाला आहे. हे नाके जिल्ह्याच्या हद्दीबाहेरील आहेत. परंतु त्या मार्गाने जाणाऱ्या वाहनचालकांना थोडाफार दिलासा मिळेल. (प्रतिनिधी)सरकारने जाहीर केलेल्या टोलनाक्यामध्ये नगर-जामखेड रस्त्यावरील पांढरी नाक्याचा उल्लेख आहे. संगमनेर तालुक्यातील वडगाव पानचा नाकाही बंदचा आदेश दिल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मात्र, टोलनाका सुरूच होता. श्रीगोंदा तालुक्यातील चिखली, संगमनेरमधील वडगाव पान, रांजणगाव देशमुख आणि नगरमधील टाकळी काझी येथील टोल नाके बंद केल्याचे सरकारने जाहीर केले आहे.