शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

तंबाखूचा कंटेनर लुटणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 11:12 IST

कंटेनरसहित एकूण ३५ लाख ६ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ दरम्यान, आरोपींनी चोरलेला कंटेनर व तंबाखूचा मुद्देमाल मनमाड दहेगाव येथे बेवारस सोडून दिलेला होता.

अहमदनगर : नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव शिवारात तंबाखुने भरलेला कंटेनर लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने पकडली. चार जणांना अटक करण्यात आली असून, ६ ते ८ जण फरार आहेत.अटक केलेल्यांमध्ये विशाल गुलाब वाघ (रा. बुधलवाडी, ता. नांदगाव, जि. नाशिक), दीपक रामदास परदेशी (रा. कुमावतनगर, मखमलाबाद नाका, पंचवटी, नाशिक), ज्योतीराम जर्नाधन पाटील, आशा नानासाहेब निकम (दोघे रा. पडसाली, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) यांचा समावेश आहे. त्यांचे साथीदार शुभम दीपक बच्छाव (रा. माधवनगर, संकलेचा शोरुममागे, मनमाड, जि. नाशिक), अनिल रामदास अहिरे (रा. गावडे निवास चाळ, महालक्ष्मीनगर, बुद्ध विहाराजवळ, अंबरनाथ पूर्व), आकाश दिगंबर फंड (रा. केमवाडी, सावरगाव, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद), माणिकराव सगळे (पूर्ण नाव माहित नाही, रा. बुधलवाडी, मनमाड, जि. नाशिक) व इतर २ ते ४ व्यक्तींच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यांचा शोध सुरू आहे.७ आॅक्टोबर रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता रामभरोसे विजयसिंग चौहान (वय 38, रा. सतलापूर मंडीदीप, ता. गोहरगंज, जि. रायसेन, मध्यप्रदेश) यांनी त्यांच्या ताब्यातील कंटेनर नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव शिवारातील हॉटेल उत्सवजवळ थांबविला होता. ते मोबाईलवरून त्यांच्या मित्रासमवेत बोलत होते. त्यावेळी क्वॉलिस गाडीतून ४ जण आले. त्यांनी कंटेनरसहित एकूण ३५ लाख ६ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ दरम्यान, आरोपींनी चोरलेला कंटेनर व तंबाखूचा मुद्देमाल मनमाड दहेगाव येथे बेवारस सोडून दिलेला होता.गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या आदेशावरून पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाटील, कर्मचारी भाऊसाहेब काळे, दत्ता हिंगडे, उमेश खेडकर, फकीर शेख, विजय वेठेकर, दत्ता जपे, रावसाहेब हुसळे, दिलीप शिंदे, रवी सोनटक्के, संदीप पवार, सचिन कोळेकर, बबन बेरड आदींच्या पथकाने आरोपींना अटक केली़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर