शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार आशा सेविका फत्ते करताहेत जंतनाशक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:39 IST

अहमदनगर : जिल्ह्यात १ ते १९ वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देण्याची मोहीम सुरू झाली असून, जिल्ह्यातील एकूण ११ लाख ...

अहमदनगर : जिल्ह्यात १ ते १९ वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देण्याची मोहीम सुरू झाली असून, जिल्ह्यातील एकूण ११ लाख ७६ हजार लाभार्थ्यांना या गोळ्या वाटप होत आहेत. तीन हजार २०० आशासेविका ही मोहीम फत्ते करत आहेत. राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त १ मार्च रोजी बहुतांश गोळ्यांचे वाटप झाले आहे. उर्वरित लाभार्थ्यांना ८ मार्चपर्यंत गोळ्या वाटप होणार आहेत.

ग्रामीण व शहरी कार्यक्षेत्रामध्‍ये एकूण ५६७९ अंगणवाडी केंद्रांमधून २ लाख ९६ हजार ९५ लाभार्थ्‍यांना, तसेच ५ हजार १७८ शासकीय, अनुदानित व खासगी शाळांमधून ८ लाख ८० हजार १८४ शालेय विद्यार्थ्‍यांना असे एकूण ११ लाख ७६ हजार २७९ लाभार्थ्‍यांना जंतनाशक गोळी देण्‍यात येणार आहे. त्‍याकरिता राज्‍यस्‍तरावरून २१ लाख ३७ हजार जंतनाशक गोळ्या जिल्ह्यासाठी प्राप्त झाल्या आहेत.

भारतात ६ ते ५९ महिन्‍यांच्‍या वयोगटातील प्रत्‍येक १० बालकांमागे ७ बालकांमध्‍ये रक्‍तक्षय आढळतो. ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक असू शकते. तसेच १५ ते १९ वर्षे वयोगटातील ५६ टक्‍के किशोरवयीन मुलींमध्‍ये व ३० टक्‍के किशोरवयीन मुलांमध्‍ये रक्‍तक्षय आढळतो.

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा उद्देश १ ते १९ वयोगटातील सर्व मुला-मुलींना अंगणवाडी, शाळा या ठिकाणी जंतनाशक गोळी देऊन त्‍यांचे आरोग्‍य चांगले ठेवणे, तसेच पोषणस्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे आहे. मोहिमेच्‍या नियोजनासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्‍य केंद्र, ग्रामीण रुग्‍णालये, नगरपालिका दवाखाने व महानगर पालिका येथील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्‍यात आले आहे.

१ मार्च रोजी बहुतांश मुलांना गोळ्या देण्यात आल्या. जर लाभार्थी त्या दिवशी आजारी किंवा त्यांना इतर कारणामुळे गोळी घेणे शक्‍य झाले नाही, त्‍यांना ८ मार्च रोजी शाळा व अंगणवाडी केंद्रामध्‍ये गोळी देण्‍यात येणार आहे.

---------------

जेथील शाळा सुरू आहेत, तेथे पहिली ते बारावीपर्यंतच्या मुला-मुलींना या गोळ्या देण्यात आल्या आहेत. परंतु कोविडमुळे जर काही विद्यार्थी शाळेत येऊ शकले नाही, तर त्यांना आशासेविका घरपोहोच गोळ्या देणार आहेत.

- डाॅ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी

------------

जंतनाशक गोळ्यांचे लाभार्थी

०१ ते ०६ वर्षे - २ लाख ९६ हजार ९५२

०७ ते १९ वर्षे - ८ लाख ८० हजार १८४

------------

तीन हजार कर्मचाऱ्यांची फौज

जिल्ह्यात या गोळ्या वाटप करण्यासाठी तीन हजार २०० आशासेविका कार्यरत आहेत. कोरोनामुळे ज्या शाळा किंवा अंगणवाडी बंद आहेत, अशा ठिकाणी हे कर्मचारी घरोघरी जाऊन गोळ्या देणार आहेत. कोरोनाच्या काळात या कर्मचाऱ्यांनी आधीही घरोघरी जाऊन काम केलेले आहे. त्यामुळे हे काम करताना त्यांना कोरोनाचा अडसर होणार नाही, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

---------

फोटो - ०३टॅबलेट डमी १,२,३,