शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंपाची रोकड लुटणारे तिघे जेरबंद

By admin | Updated: May 14, 2017 19:26 IST

सव्वा सात लाख रुपये पल्सरवरुन आलेल्या चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून लंपास केली.

आॅनलाईन लोकमतसंगमनेर (अहमदनगर), दि़ १४ - तालुक्यातील कऱ्हे घाटानजीक निमोण येथील साईसिध्दी पेट्रोल पंपाची रक्कम संगमनेर येथे बँकेत भरणा करण्यासाठी दोन कर्मचारी जात असताना त्यांच्याकडील सव्वा सात लाख रुपये पल्सरवरुन आलेल्या चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून लंपास केली. ही घटना २ मे रोजी घडली होती. या प्रकरणातील तिघांना पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरु आहे.पोलीस सूत्रांची माहिती अशी की, निमोण येथील श्रीकांत गोमासे यांच्या मालकीच्या साईसिध्दी पेट्रोल पंपाच्या रकमेचा भरणा संगमनेर येथील बँकेत भरण्यासाठी पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक श्रीराम गेणू कर्डेल व सेल्समन संभाजी राजाराम तळप हे दोघे जण दि. २ मे रोजी ३ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून कऱ्हे घाट येथून जात असताना चौघा जणांनी पल्सर मोटारसायकलीवरुन येवून कर्डेल व तळप या दोघांना पिस्तुलाचा धाक दखवून दिवसाढवळ्या ७ लाख १९ हजार रुपयांची रोख रक्कम व चाळीस हजार रुपयांचे चेक चोरुन चोरट्यांनी पोबारा केला होता. त्यानंतर घटनेची माहिती समजताच श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अजय देवरे यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली होती. यासाठी शोधासाठी पथके नेमली होती. त्यानुसार जिल्हा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने तिघा जणांना निमोण येथे पकडले. उर्वरित पाच जण अद्यापही फरार आहेत. त्यांचाही हे पथक कसून शोध घेत आहेत.