शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीतील तिन्ही पक्ष कायमचे एकत्र नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:21 IST

अहमदनगर : राज्यातील आमची महाविकास आघाडी आणि सरकार भक्कम आहे. पुढील २० ते २५ वर्षे तरी आम्हाला धोका नाही. ...

अहमदनगर : राज्यातील आमची महाविकास आघाडी आणि सरकार भक्कम आहे. पुढील २० ते २५ वर्षे तरी आम्हाला धोका नाही. अर्थात, सर्वांनाच पक्ष विस्ताराचा अधिकार आहे, शिवाय आम्ही कायमचे एकत्र राहणार आहोत, असेही नाही. तीन पक्षांच्या नेत्यांचे एकमत आहे, तोपर्यंत आघाडी कायम राहील. मात्र, यात मतभेद निर्माण होतील, असे कोणी वागू आणि बोलू नये, असे राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी सांगितले.

अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा आढावा घेतल्यानंतर, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्या राज्यातील महाविकास आघाडीत वाझे प्रकरण, रश्मी शुल्का, परमबीर सिंग प्रकरणावरून अस्वस्थता आहे. याबाबत आघाडीतील नेत्यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांकडे पत्रकारांनी लक्ष वेधले. त्याला उत्तर देताना मुश्रिफ म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सज्जन आणि सोज्ज्वळ व्यक्तिमत्त्व आहे. अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो, असे खुद्द ठाकरे यांनीच सांगितले. आम्ही अनुभवी मंत्र्यांना सल्ला देऊच, पण तो ऐकायचा की नाही, कशाच्या आधारे आपले मत बनवायचे, हा त्यांचाच अधिकार असेल. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाल्याच्या अफवा आहेत. भाजपचे नेते यावर प्रतिक्रिया देऊन संभ्रम निर्माण करीत आहेत. पोलीस दलातील फौजदार पदावर कार्यरत एखाद्या अधिकाऱ्याचे कारनामे उघड झाले, म्हणजे लगेच सरकार अडचणीत आले असे नसते. सचिन वाझे यांना महागड्या गाड्या घ्या, ऐशोआराम करा, असे सरकारने त्यांना थोडेच सांगितलेय, असा सवाल मुश्रिफ यांनी केला. एखाद्या डॅशिंग अधिकाऱ्याला शाबासकी देणे म्हणजे त्याला गैरकृत्य करण्यास सवलत देणे नाही. पोलीस अधिकाऱ्यांना वर्दीचा अभिमान असावा. वर्दीचा उपयोग समाजासाठी करता आला पाहिजे. त्या आडून गैरकृत्य करता कामा नये. मात्र, याचाच त्यांना विसर पडल्याचे दिसते. आता या प्रकरणाचा तपास एनआयएकडे गेला आहे. आमचीही इच्छा आहे की, या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास लागावा. ती स्फोटके कोणी ठेवली, कशासाठी ठेवली, याचा मास्टरमाइंड कोण हे सत्य बाहेर आले पाहिजे, अशी अपेक्षा मुश्रिफ यांनी व्यक्त केली.

परबीर सिंग प्रकरणाबाबत मुश्रिफ म्हणाले, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना भाजप माफीचा साक्षीदार बनवू पाहत आहे. अन्वय नाईक आत्महत्याप्रकरण आणि दूरचित्रवाणी माध्यमांचा टीआरपी घोटाळा प्रकरण याचा तपास परमबीर सिंग यांनी उत्साहाने केला. त्यामध्ये अर्णब गोस्वामी अडचणीत आले. तेव्हा परमबीर सिंग भाजपच्या रडारवर होते. त्यानंतर, वाझे प्रकरण घडले. त्याचे धागेदोरे थेट परमबीर सिंग यांच्यापर्यंत असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांतून प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले. तेथे त्यांनी भेटीगाठी घेतल्या आणि नंतर परमबीर सिंगांचे ते पत्र समोर आले. हा घटनाक्रम पाहिला, तर भाजप त्यांना माफीचा साक्षीदार करून यातून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसते. रश्मी शुक्ला यांचे फोन टॅपिंग आणि अपक्ष आमदारांना भाजपमध्ये येण्यास सांगणे हे प्रकारही गंभीर आहेत. त्यामुळे या सर्वांचा लवकरात लवकर छडा लागला पाहिजे, अशी अपेक्षा असल्याचे मुश्रिफ म्हणाले.