कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून कडक निर्बंध लागू करण्यात आले असून केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे. इतर व्यवहार बंद असल्याने गुन्हेगारीच्या घटनांमध्ये काही प्रमाणात घट झाली असली तरी चोरीच्या घटना मात्र सुरूच आहेत. यामध्ये घरफोडीचे सर्वाधिक जास्त प्रमाण आहे. नगर शहरासह जिल्ह्यात रात्रीसह दिवसाही घरफोडीच्या घटना घडत आहेत. चोरटे बंद घरे व दुकानांना लक्ष्य करत आहेत. कोरोनामुळे काही कुटुंब शहरातून गावाकडे गेली आहेत. चोरटे असे घर हेरून तेथे चोरी करत आहेत. तसेच ग्रामीण भागात कुटुंब शेतावर कामास गेल्यानंतर चोरटे बंद घराचे कुलूप तोडून चोऱ्या करत आहेत. मोटारसायकल चोरीच्या घटनाही सुरूच आहेत.
................
लूटमारीच्या घटना सुरूच
जिल्ह्यात कोरोनाच्या काळातही लूटमारीच्या घटना सुरूच आहेत. सराईत गुन्हेगारांच्या टोळ्या वाहनचालकांना निर्जन ठिकाणी अडवून त्यांची लूटमार करत आहेत. चार दिवसांपूर्वी नगर तालुक्यातील गोरक्षनाथ गडावर चोरट्यांनी दोघांची लूटमार केली. या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. महामार्गावर लूटमार करणाऱ्या अशा अनेक टोळ्या सध्या जिल्ह्यात कार्यरत आहेत.
...............
रस्त्यावर घात लावून बसतात लुटारू
नगर शहरातून ५ महामार्ग जातात. या रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. लुटारूंच्या टोळ्या रात्रीच्या सुमारास परप्रांतीय वाहनचालकांना घेरून त्यांची लूटमार करतात. लूटमार झालेले बहुतांश वाहनचालक तक्रार देण्यास टाळतात. त्यामुळे या लुटारूंची हिंमत वाढते. गेल्या काही दिवसात स्थानिक पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने लुटारूंच्या काही टोळ्या जेरबंद केल्या आहेत.
........
गेल्या सात दिवसांत जिल्ह्यात घडलेल्या चोरीच्या घटना
.............
चोऱ्या-४३
जबरी चोऱ्या-६
--
नेट फोटो डमी
रेप
थिफ
मर्डर
२७ कोरोना अँड थिफ-डमी