राहुरी : आधीच पावसाची क मतरता, ठिकठिकाणी असलेले बंधारे व नदीपात्रातील वाळूचे खड्डे यामुळे मुळा धरणात अजून नवीन पाण्याची आवकच झालेली नाही. धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर गेल्या काही दिवासांपासून रिमझिम पाऊस सुरू असला तरी पाण्याची पातळी वाढण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. धरणाचा पाणीसाठा ४९३३ दलघफूवर स्थिरावला आहे.कोतूळ येथे चार मिलीमिटर पावसाची नोंद झाली़ दिवसभर ढगाळ वातावरण होते़ वाऱ्याचा वेगही वाढला होता़ परंतु पावसाने मात्र पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गही अस्वस्थ आहे़गेल्या चार दिवसांत मुंबई व कोकणात पावसाने हजेरी लावली़ मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरही पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता़ मात्र धरणावर समाधानकारक पाऊस न पडल्याने पातळी स्थिर आहे़ अशीच स्थिती राहिल्यास मुळा धरणात केवळ पिण्यासाठीच पाणी उपलब्ध राहील़ त्यामुळे शेती व्यवसाय संकटात येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे़धरणाच्या लाभ क्षेत्रावरही पावसाने विश्रांती घेतली आहे़ त्यामुळे खरीप हंगाम वाया गेल्यात जमा आहे़ शेतातील उभी पिके व चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ (तालुका प्रतिनिधी)
मुळा धरणात नवीन आवकच नाही
By admin | Updated: July 18, 2014 01:39 IST