शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

बनावट अपंग प्रमाणपत्र प्रकरण ‘जैसे थे’

By admin | Updated: July 6, 2014 00:17 IST

अहमदनगर : बदली टाळण्यास बनावट अपंग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या ७६ प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषदेने दोषी ठरविले.

अहमदनगर : बदली टाळण्यास बनावट अपंग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या ७६ प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषदेने दोषी ठरविले. मात्र, त्यापैकी ४८ शिक्षकांना सहाय्यक आयुक्तांनी दोषी ठरवित, उर्वरित १६ शिक्षकांवर ठपका ठेवला होता. एकाच आरोपाखाली दोषी असणाऱ्या या शिक्षकांना वेगवेगळा न्याय देण्यात आलेला आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी विभागीय आयुक्तांचे मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यावर अद्याप कोणतीच हालचाल झालेली नाही. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय गाजला होता. सुमारे अडीच वर्षापूर्वी जिल्हा परिषदेत प्रशासकीय बदल्या टाळण्यासाठी प्राथमिक शिक्षकांनी बनावट अपंग प्रमाणपत्र सादर केलेले होते. जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रमाणपत्राची पडताळणी केल्यानंतर त्या ७६ शिक्षकांचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे सिध्द झाले. त्यावर शिक्षण विभागाने संबंधितांवर गुन्हे दाखल करत त्यांना निलंबित केले होते. निलंबित करण्यात आलेल्या या शिक्षकांची खातेनिहाय चौकशी झाली. नाशिक येथे सहाय्यक आयुक्त यांनी या सर्व शिक्षकांची चौकशी केली. यात ४८ शिक्षकांवर दोष सिध्द होत नाही, तर १६ शिक्षकांना दोषी ठरविण्यात आलेले असून उर्वरित ११ शिक्षकांचा अहवाल येणे बाकी आहे. दरम्यान, या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या गेल्या आठवड्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल यांनी या प्रकरणी विभागीय आयुक्त यांचे मार्गदर्शन घेणार असल्याचे जाहीर केले होते. विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त एकनाथ डवले नगर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी या प्रकरणी कोणतेच मार्गदर्शन घेण्यात आले नसल्याची माहिती मिळाली आहे. या मुळे हे प्रकरण सध्या जैसे थे असल्याचे चित्र आहे. शिक्षण विभागात या विषयांवर बोलण्यास कोणीच तयार नाही.(प्रतिनिधी)