शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
4
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
5
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
6
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
7
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
8
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
9
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
10
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
11
केंद्रात नोकरीसाठी मुलाखत दिलेले ६४% उमेदवार अपात्र 
12
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
13
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
14
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
15
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
16
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
17
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
19
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
20
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान

दहा टक्केच लाचखोरांवर दोषारोपपत्र !

By admin | Updated: July 28, 2014 00:52 IST

सुदाम देशमुख, अहमदनगर लाचखोर अधिकारी रंगेहाथ पकडला...अशा आशयाच्या बातम्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धी माध्यमांना दिल्या जातात.

सुदाम देशमुख, अहमदनगरलाचखोर अधिकारी रंगेहाथ पकडला...अशा आशयाच्या बातम्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धी माध्यमांना दिल्या जातात. मात्र लाचखोर अधिकाऱ्याला अटक होते, तो जामिनावर सुटतो...आणि काही काळानंतर समाजात उजळ माथ्याने फिरू लागतो. त्याचे कोणालाच सोयरसुतक राहत नाही. नंतर तपास थंड होतो. प्रकरणाचे पुढे काय होते....तर काहीच नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्षभरात पकडलेल्या लाचखोरांपैकी फक्त १० टक्के अधिकाऱ्यांवर दोषारोपपत्र दाखल झाले आहे. ही प्रकरणेही पुढे सरकली नाहीत. नगर जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत लाचखोरीचे अनेक प्रकार उजेडात आले, त्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा आढावा़लाचखोरांच्या ७० टक्के प्रकरणांचा तपास प्रलंबित आहे. अन्य प्रकरणे अभियोगपूर्व मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. त्यामुळे लाचखोर अधिकारी-कर्मचारी उजळ माथ्याने समाजात वावरत आहेत. २०१३-१४ मध्ये आतापर्यंत राज्यात ७०४ लाचखोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यातील ६६० प्रकरणांमध्ये सापळा लावण्यात आला होता. २८ कर्मचाऱ्यांची अपसंपदा जप्त करण्यात आली. अन्य भ्रष्टाचाराची २८ प्रकरणे आहेत. ७०४ गुन्ह्यांपैकी ४८४ प्रकरणांचा तपास प्रलंबित आहे. म्हणजे जवळपास ७० टक्के प्रकरणांमध्ये तपास अपूर्ण आहे. अभियोगपूर्व मंजुरीकरिता १२२ प्रकरणे प्रलंबित आहेत. ७१ प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल झाले असून त्याचा अद्याप कोणताही निकाल लागलेला नाही. ७७ टक्के सुटले२००९ ते २०१४ या साडेपाच वर्षांतील अहवालान्वये २५ टक्के लाचखोरांना शिक्षा झाली आहे. निर्दोष सुटलेल्या अधिकाऱ्यांचीच संख्या जास्त आहे. शिक्षा झालेल्या अधिकाऱ्यांची सरासरी २३ टक्के एवढीच आहे. म्हणजे ७७ टक्के अधिकारी निर्दोष सुटले. न्यायालयामध्ये ही प्रकरणे टिकत नसल्याचे चित्र आहे. पंच साक्षीदारांसह लाचखोरांविरोधात सापळा रचलेला असूनही नंतर प्रकरण न्यायालयात भक्कमपणे मांडले जात नसल्याने लाचखोर अधिकारी पुन्हा सेवेत रूजू होतात.लाचखोरांची प्रकरणे व स्थिती वर्षएकूणशिक्षानिर्दोष२००९४६६१०६३६०२०१०३५३६८२८५२०११३८३९०२९३२०१२४९४११८३७६२०१३३८७८०३०७२०१४१४१४०१०१