कर्जत : व्यवसाय करताना कोणी काही त्रास देत असेल तर सांगाण संबंधितांचा बंदोबस्त करू, अशी ग्वाही पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
कर्जत शहरातील कुळधरण रस्त्यालगत असलेल्या व्यापाऱ्यांची यादव यांनी मंगळवारी रात्री बैठक घेतली. येथे चोऱ्या होऊ नये, वाहतूक कोंडी, सीसीटीव्ही बसविणे याबाबत बैठकीत चर्चा झाली. शहरात चोऱ्या होऊ नये यासाठी ग्रामसुरक्षा दल स्थापन करून रात्रीची गस्त, नाकाबंदीसाठी नागरिक व व्यापारी यांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन यादव यांनी केले. व्यापाऱ्यांनी दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. काही कॅमेरे मुख्य रस्त्याच्या दिशेने बसवावेत, याबाबत सूचना दिल्या.
व्यापाऱ्यांना कोणी त्रास देत असेल तर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करावीण संबंधितांचा बंदोबस्त केला जाईल, असे यादव यांनी सांगितले. व्यापाऱ्यांनीही रात्रीच्यावेळी एखादा वॉचमन नेमावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले.
कोठेही काही घटना समजली तर पोलिसांना कळवाण कर्जत-कुळधरण रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य कराण मुलींना त्रास देणे, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून नागरिकांना त्रास देणे, गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकणे याकडे लक्ष देऊन माहिती द्या, असे आवाहन पोलिसांनी केले.
यावेळी राहुल नवले, नारायण तनपुरे, राहुल खराडे, विशाल छाजेड, नितीन देशमुख, दत्तात्रय भोसले, संजय शिंदे, अर्जुन शिंदे, नितीन तनपुरे, शरद तनपुरे, अमृत सोनमाळी, दयानंद पाटील, रतन चौधरी, अमोल म्हेत्रे, गोकुळ शिंदे, विजय नेवसे, प्रवीण मुनोत, रवींद्र तनपुरे, संपत माने आदी व्यापारी उपस्थित होते.