अहमदनगर/पाथर्डी : अहमदनगर व बीड जिल्ह्याच्या हद्दीवरील महिंदा (ता. आष्टी, जि. बीड) येथील तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री हे सोमवारी सकाळपासून बेपत्ता आहेत. याबाबत येथील कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून ते नगर येथील स्थानकातून बेपत्ता झाल्याचे कळते.महाराज गडावरून गायब झाल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भक्तांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला़ मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही़ दरम्यान महाराजांनी गड सोडण्यापूर्वी त्यांचा मोबाईल, कानातील कुंडल, चारचाकी वाहन अशा सर्व वस्तू गडावरच सोडल्या आहेत. गडावरील काही विकासकामाबाबत एका राजकीय कार्यकर्त्याने महाराजांना धमकावल्याची चर्चा स्थानिक ग्रामस्थांमध्ये आहे़ तसेच कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीतही या वादाचा उल्लेख आहे़
तारकेश्वर गडाचे महंत बेपत्ता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 04:57 IST