शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

ताई..... आपला आशिर्वाद असू द्या...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 17:19 IST

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राजश्री घुले यांनी सर्व सभागृहाला अभिवादन करत सहकार्याची विनंती केली़ त्यानंतर माजी अध्यक्षा शालिनी विखे यांचे चरणस्पर्श करीत घुले यांनी शालिनतेचे दर्शन घडविले़ तसेच ताई आपला आशीर्वाद असू द्या, असे आर्जव केले़ 

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर: जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राजश्री घुले यांनी सर्व सभागृहाला अभिवादन करत सहकार्याची विनंती केली़ त्यानंतर माजी अध्यक्षा शालिनी विखे यांचे चरणस्पर्श करीत घुले यांनी शालिनतेचे दर्शन घडविले़ तसेच ताई आपला आशीर्वाद असू द्या, असे आर्जव केले़ सभागृहात एकीकडे राजश्री घुले यांचा सत्कार सुरु होता तर दुसरीकडे त्यांचे पती चंद्रशेखर हे विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत होते़ सर्वांशी हस्तांदोलन करीत सहकार्याची अपेक्षा करीत होते़ भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांचीही भेटघेत घुले यांनी सहकार्याची अपेक्षा केली़ अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत अर्ज मागे घेऊन सहकार्य केले़ पुढील काळात आम्हीही तुम्हाला सहकार्य करु़ सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करु, असे सांगत घुले यांनी वाकचौरे यांच्याकडे सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली़ घुले यांची निवड झाल्यानंतर त्यांना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले़ सदस्य, कार्यकर्त्यांकडून त्यांचा सभागृहात सत्कार होत असताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या़ हे आनंदाश्रू पुसत त्यांनी अनेकांचा सत्कार स्वीकारला़-------------राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री दिलीप वळसे, मंत्री जयंत पाटील, शंकरराव गडाख, मंत्री सुभाष देसाई, आमदार अरुण जगताप, मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, पक्षनिरीक्षक अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, सेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे या सर्वांनी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोलाची भूमिका निभावली. त्यामुळेच अध्यक्ष पदाची संधी मिळाली असून, महाविकास आघाडीतील सर्व मंत्री व आमदार यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद सदस्यांना सोबत घेऊन जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.     - राजश्री घुले, अध्यक्षा, जिल्हा परिषद---------महाविकास आघाडीतील सर्व नेते, काँगे्रस, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व सर्व सदस्यांनी मला सहकार्य केले़ त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे़ जनतेच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे़     - प्रताप शेळके,     नूतन उपाध्यक्ष, जिल्हा परिषद