शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता दुरुस्तीसाठी काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 15:38 IST

नेवासा-शेवगाव रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. याबाबत दोन वेळेस निवेदन देऊन ही बांधकाम विभागाने दखल न घेतल्याने छत्रपती युवा सेनेने सोमवारी तालुक्यातील सौंदळा येथे बांधकाम विभागाचीच प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून बांधकाम विभागाचा निषेध केला.

नेवासा : नेवासा-शेवगाव रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. याबाबत दोन वेळेस निवेदन देऊन ही बांधकाम विभागाने दखल न घेतल्याने छत्रपती युवा सेनेने सोमवारी तालुक्यातील सौंदळा येथे बांधकाम विभागाचीच प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून बांधकाम विभागाचा निषेध केला. प्रतिकात्मक प्रेतावर रस्त्याच्या कडेलाच अग्नीडाव देवून अनोखे आंदोलन केले.नेवासा-शेवगाव  रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. अनेकदा या रस्त्यावर अपघात होत आहेत. याबाबत बांधकाम विभाग झोपेचे सोंग घेत आसल्याने वाहनधारकांत  संताप व्यक्त होत आहे. या अगोदर छत्रपती युवा सेनेने उपोषणाचे निवेदन देवूनही बांधकाम खात्याने दखल घेतली नाही. त्यामुळे सोमवारी सकाळी सौंदळा येथे प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढल्याने झोपलेल्या बांधकाम खात्याला जाग आली. यावेळी छत्रपती युवा सेनेचे प्रदेश संघटक नवले यांनी सात दिवसांत रस्त्याचे काम झाले नाहीतर बांधकाम खात्याच्या कार्यालयातच दशक्रियाविधी करण्याचा इशाराही दिला. याप्रसंगी सरपंच शरद अरगडे, नरेंद्र नवथर, निलेश कडू, कृष्णा नवथर, गणेश नवथर, बाबासाहेब सरकाळे, तालुकाध्यक्ष पप्पू बोधक, अक्षय बोधक, संदेश बोधक, ज्ञानेश्वर गव्हाणे, मनोज आरगडे, विजय नवले, विशाल शिंदे, संकेत बोधक, भेंडा शहर अध्यक्ष अविनाश गाडेकर, सागर कोतकर, अक्षय आरगडे, प्रसाद पाटोळे, गणेश आरगडे, सिद्धार्थ आरगडे, चंद्रकात आरगडे, अभिजीत बोधक, नितीन आरगडे, गणेश चित्ते, संदीप लोनकर, संजय बोधक यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.छत्रपती युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी आंदोलन करताच बांधकाम खात्याला जाग आली. यावेळी आंदोलनकर्त्यांना रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सात दिवसात करण्यात येईल, असे आश्वासन बांधकाम विभागाचे हेमंत शेवाळे यांनी दिले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरroad safetyरस्ते सुरक्षा