शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

मळगंगेच्या जयघोषात घागर मिरवणूक

By admin | Updated: May 2, 2016 23:31 IST

पारनेर : निघोज येथील मळगंगा देवीच्या घागर मिरवणूक सोहळ्याला लाखो भाविकांनी हजेरी लावून मळगंगेचा जयजयकार केला़

निघोज यात्रा : मळगंगा देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची हजेरीपारनेर : निघोज येथील मळगंगा देवीच्या घागर मिरवणूक सोहळ्याला लाखो भाविकांनी हजेरी लावून मळगंगेचा जयजयकार केला़निघोज येथील मळगंगा देवीच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ झाला़ शनिवारी सकाळी पुजारी ठकाराम गायखे, सुनील गायखे यांनी महाअभिषेक केला. सकाळपासूनच राज्यभरातून आलेल्या भाविकांनी मळगंगा देवीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. यात्रेचे नियोजन देवस्थानचे अध्यक्ष बाबाशेठ कवाद, प्रभाकर कवाद, शांताराम लंके, सचिव बबन ढवण, महेश ढवळे आदींनी केले. शनिवारी रात्री निघोजमध्ये पालख्यांचे स्वागत करण्यात आले. रविवारी सकाळी मळगंगा देवीची घागर मिरवणूक मंदिरापासून निघाली. शहराच्या मुख्य पेठेतून ही मिरवणूक सुमारे दोन तासाने बारवेजवळ पोहोचली़ भाविकांनी केलेल्या मळगंगेच्या जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला. घागर मिरवणूक व पालखी सोहळ्याचे ठिकठिकाणी डिजिटल फलकावर थेट प्रक्षेपण करण्यात आले होते़ यात्रेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून तहसीलदार भारती सागरे, पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर, उपनिरीक्षक अहिरे व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. चंद्रकांत लामखडे, अमृता रसाळ, रामदास वरखडे यांच्यासह सरपंच ठकाराम लंके, उपसरपंच बाबाजी लंके आदींनी यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी परिश्रम घेतले़ (तालुका प्रतिनिधी)यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून निघोज ग्रामीण पतसंस्थेसह सर्व सामाजिक संघटना व तरुण मंडळांनी ठिकठिकाणी पाणपोई सुरू केल्या होत्या़ त्यामुळे भाविकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावली नाही़भर उन्हात आलेल्या भाविकांना विविध ठिकाणी सुरु केलेल्या पाणपोई दिलासादायक ठरल्या़ निघोजमध्ये सुरु केलेल्या या पाणपोर्इंवर मोठी गर्दी होत होती़भाविकांना स्थानिक टारगटांचा त्रासनिघोज येथील यात्रेसाठी आलेल्या भाविकांना रविवारी रात्री बाजारतळ परिसरात वाहने लावण्यावरून काही स्थानिक टारगटांनी दमबाजी करण्याचा प्रयत्न केला़ पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील अहिरे यांनी लगेच घटनास्थळी जाऊन टारगटांना समज दिली़भाविकांची कुंडावरही मोठी गर्दीरविवारी सकाळी घागर मिरवणूक झाल्यानंतर दुपारपासूनच रांजणखळगे, कुंड या पर्यटनस्थळावरील गर्दीचा ओघ वाढला़ सोमवारी दिवसभर राज्यभरातून कुंड पर्यटन क्षेत्राकडील यात्रेत भाविकांनी सहभाग घेतला़ यात्रेत खेळण्यांसह विविध वस्तुंची दुकाने थाटण्यात आली होती. यात्रेत विविध वस्तूंच्या खरेदीचा आनंदही भाविकांनी लुटला़