शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पाच कर्मचारी निलंबित

By admin | Updated: January 17, 2024 17:37 IST

अहमदनगर : वर्षभरात ग्रामपंचायतीत दप्तर अपूर्ण ठेवणार्‍या, आर्थिक अनियमितता, आॅनलाईन रेकॉर्ड पूर्ण न करणार्‍या चार ग्रामसेवक

अहमदनगर : वर्षभरात ग्रामपंचायतीत दप्तर अपूर्ण ठेवणार्‍या, आर्थिक अनियमितता, आॅनलाईन रेकॉर्ड पूर्ण न करणार्‍या चार ग्रामसेवक आणि राहुरी पंचायत समितीचा एक कनिष्ठ साहाय्यक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी ही कारवाई केली आहे़ ग्रामपंचायत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुरी तालुक्यातील बी.बी. वाहूरवाघ आणि बी. के. बागूल यांनी नेमणुकीच्या ठिकाणी असणार्‍या ग्रामपंचायतीत संग्राम कक्षात आॅनलाईन माहिती भरलेली नाही. तसेच ते नेमणुकीच्या मुख्यालयात राहत नव्हते. त्यांनी आॅनलाईन माहिती न भरल्याने त्या ठिकाणी मार्च एण्ड बंद करता आला नाही. याबाबत सुुरुवातीला गटविकास अधिकारी स्तरावरून त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, उपयोग झाला नव्हता. पाथर्डी तालुक्यातील नांदूरनिंबा आणि कोळसांगवी या ग्रामपंचायतीत नेमणुकीस असणार्‍या एस.एस. दातीर यांनी आॅडिटसाठी ग्रामपंचायतींची माहिती उपलब्ध करून दिली नाही. तसेच अंगणवाडी इमारतीच्या कामात अनियमितता केलेली आहे. आॅनलाईन दाखले भरलेले नाहीत. पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील दिलीप मुरलीधर कपिले याने बदली झाल्यानंतरही दोन वर्ष ग्रामपंचायतीचे दप्तर हस्तांतरण केलेले नव्हते. यामुळे या चारही ग्रामपंचायत कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. राहुरी पंचायत समितीत बालकल्याण विभागातील कनिष्ठ साहाय्यक विजय तुपे याने अन्य कर्मचार्‍यांचे वेतन त्यांच्या बँक खात्यावर वर्ग न करता, स्वत:च्या खात्यावर वर्ग केल्याचा ठपका ठेवून त्याच्यावर कारवाई केली आहे. (प्रतिनिधी)