......
चितळे रस्त्यावर वाहतूक कोंडी
अहमदनगर : शहरातील चितळे रस्त्यावर दुचाकी वाहने सर्रास उभी केली जात आहेत. त्यामुळे चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी रस्ता शिल्लक राहत नाही. परिणामी या मार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे.
....
वृक्ष गणना लांबली
अहमदनगर: महापालिकेच्या वतीने शहरातील वृक्षांची गणना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु,उद्यान विभागाकडून अद्याप वृक्ष गणनेचे काम हाती घेण्यात आले नाही.
......
अत्यंविधीसाठी निविदा
अहमदनगर: कोरोनामुळे मृत पावलेल्यांचा अंत्यविधी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत असून, त्यासाठी दोन स्वतंत्र निविदा मागविण्याचा आदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
.....
अंध, अपंगांना लस
अहमदनगर: महापालिकेच्या उपकेंद्रांत सोमवारी अंध व अपंगांना मंगळवारी कोरोनावरील लस देण्यात आली. दिवसभरात ४५ जणांना लस देण्यात आली असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली.
....
उसाचा ट्रक उलटला
अहमदनगर: नगर-पुणे रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागासमोरील भिंगारकडून येणारा उसाने भरलेला ट्रक उलटला. त्यामुळे ट्रकमधील ऊस रस्त्यावर पडला होता. हा ऊस कामागारांनी पुन्हा ट्रकमध्ये भरला. यामुळे या मार्गावर काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती.
.....