खासदार डॉ. विखे यांनी मालधक्क्याला नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी धक्क्यावरील प्रश्न जाणून घेतले. भाजपचे नेते प्रकाश चित्ते, माजी सभापती दीपक पटारे, माजी शहराध्यक्ष किरण लुणिया, संजय पांडे, गणेश मुदगुले, गिरीधर आसने, विठ्ठल राऊत यावेळी उपस्थित होते.
डॉ. विखे म्हणाले की, केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे व मी स्वत: मालधक्क्याच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. भाजपचे प्रकाश चित्ते यांनी येथील कष्टकरी, गोरगरीब घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला आहे. त्यामुळे मालधक्क्याच्या माध्यमातून चित्ते यांना आवश्यक ती मदत पुरविली जाईल.
यावेळी विलास बोरावके, नाना पाटील, धनंजय जाधव, राजेंद्र चव्हाण, संजय विरकर, विलास गिळे, किरण बोरावके, संजय यादव, बाळासाहेब हिवराळे, सोमनाथ कदम, संदीप वाघमारे उपस्थित होते.
--------
फोटो ओळी : खासदार विखे
खासदार डॉ.सुजय विखे यांनी येथील रेल्वे मालधक्क्यास भेट दिली.
--------