शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

अधिकार्‍यांना कोंडून राज्यमार्गरोखला

By admin | Updated: March 2, 2015 13:25 IST

नेवासा तालुक्यातील खरवंडी व परिसरात अजुनही मुळा पाटपाण्याचे रोटेशन न पोहोचल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकर्‍यांनी शनिवारी अधिकार्‍यांना कोंडून नगर-औरंगाबाद महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन केले.

नेवासा : नेवासा तालुक्यातील खरवंडी व परिसरात अजुनही मुळा पाटपाण्याचे रोटेशन न पोहोचल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकर्‍यांनी शनिवारी अधिकार्‍यांना कोंडून नगर-औरंगाबाद महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन केले.माजी आमदार संभाजीराव फाटके, माजी जि.प. सदस्य अजित फाटके, प्रकाश उंदरे, संभाजी मुरकुटे, मुकुंद भोगे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.मुळा पाटबंधारेच्या वडाळा बहिरोबा शाखेअंतर्गत असलेल्या चारी ५ व ६ वरील शेतकरी आवर्तन सुरु झाल्यापासून पाण्यासाठी आग्रही होते. मागील आवर्तन काळात या चारीवरील शेतकर्‍यांना अजिबात पाणी न मिळाल्याने जानेवारी महिन्यापासूनच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले. पाण्याअभावी हातातोंडाशी आलेली पिके करपत आहेत. अधिकार्‍यांकडून आश्‍वासनाशिवाय काहीच मिळत नसल्याने वडाळा बहिरोबा, निपाणी निमगांव, खरवंडी येथील संतप्त शेतकर्‍यांनी वडाळा बहिरोबा शाखा कार्यालयात नेवासा उपविभागाचे उपअभियंता नवलाखे, शाखाधिकारी के.सी.दुशिंग, एस. के. शेळके, आर.बी.पळघडमल यांच्या कार्यालयास कुलूप ठोकून शनिवारी सकाळपासूनच त्यांना कोंडले.मुळा पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता ए.एस.वडार यांना भ्रमणध्वनीवरुन माहिती देऊनही उपयोग होत नसल्याचे निदर्शनास येताच शेतकर्‍यांनी शाखा कार्यालयासमोर नगर-औरंगाबाद महामार्गावर ठाण मांडले. संभाजीराव फाटके यांनी अशी परिस्थिती प्रथमच निर्माण झाल्याचे सांगून कालवा सल्लागार समितीच्या चुकीच्या नियोजनामुळे ही वेळ आल्याचा आरोप केला. मुळा धरणाच्या निर्मितीच्यावेळी बारमाही पाणी पुरवठय़ाचे नियोजन होते. ते गेल्या काही वर्षात दोन आवतर्नावर आलेच कसे? असा सवालही त्यांनी केला. अधिकारी राजकारण्यांच्या हातचे कळसूत्नी बाहुली असल्याप्रमाणे वागत असल्याचा आरोप अजित फाटके यांनी केला. मुकुंद भोगे यांचेही भाषण झाले. आंदोलनात प्रकाश उंदरे, संभाजी मुरकुटे,आबासाहेब फाटके, बाबासाहेब फाटके, खरवंडीचे सरपंच सिद्धार्थ भोगे, पोलीस पाटील संदीप फाटके तसेच तालुक्यातील शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)

■ मुळा पाटपाण्याच्या रोटेशनप्रश्नी नगर-औरंगाबाद महामार्गावर सुरु करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनप्रसंगी आंदोलनकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या. मुळा पाटबंधारेचे उपअभियंता नवलाखे यांनी सोमवारपासून चारी ५ व ६ ला पाणी सोडण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.