शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

... तरीही जेऊर येथे भरला आठवडे बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:19 IST

केडगाव : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असतानाही हा आदेश झुगारत ...

केडगाव : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असतानाही हा आदेश झुगारत शनिवारी जेऊर येथे आठवडे बाजार भरला होता.

जेऊर पंचक्रोशीतील इतर गावांत बाजार भरत नसल्याने जेऊरचा आठवडे बाजार मोठ्या प्रमाणात भरत असतो. परंतु, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश दिले होते. तरीही शनिवारी जेऊर येथे बाजार भरून मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.

जेऊरचा आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय २२ फेब्रुवारी रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये घेण्यात आला होता. परंतु, त्या निर्णयाला काही सदस्यांनी तसेच व्यापाऱ्यांनी विरोध केल्याने बाजार पूर्ववत भरण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्वच बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

जेऊरचा आठवडे बाजार गावातील सिना नदीपात्रात भरत असतो. बाजार बंदचा आदेश असल्याने बाजार सिना नदीपात्रात न भरता महावितरण कंपनीच्या चौकात भरला होता. बाजारात व्यापारी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

बाजार भरल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना समजल्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश थोरवे व पोलीस नाईक दीपक गांगर्डे यांनी बाजारकरुंना समज देत तेथून पिटाळून लावले. परत गर्दी न करण्याची सक्त ताकीद दिली.

..............

नगर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रत्येक नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. बाजार बंद असल्याने व्यापारी व शेतकऱ्यांची अडचण होत असली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी गर्दी न करता आपला भाजीपाला विक्री करावा.

-भीमराज मोकाटे, सरपंच, इमामपूर

..................

ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर व सामाजिक आंतर राखणे गरजेचे आहे. गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.

-डॉ. योगेश कर्डिले, प्राथमिक आरोग्य केंद्र, जेऊर