शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक परिषदेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:34 IST

-------------- वेतनवाढीसाठी कर्मचारी आक्रमक अहमदनगर : अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांची वेतन कराराची मुदत संपली असताना नवीन करार करून महागाई ...

--------------

वेतनवाढीसाठी कर्मचारी आक्रमक

अहमदनगर : अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांची वेतन कराराची मुदत संपली असताना नवीन करार करून महागाई निर्देशांकानुसार ८ ते १२ हजार रुपयांपर्यंत वेतनवाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर प्रकरण सहायक कामगार आयुक्तांकडे गेले असताना तारखेला हजर न राहता एकूण वेतनाच्या फक्त ७ टक्के वेतनवाढ करण्याच्या निर्णयावर ठाम असलेल्या ट्रस्टच्या विरोधात लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर अरणगाव ग्रामपंचायत येथे झालेल्या बैठकीत गुरुवारी (दि. १७) सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले. या बैठकीसाठी भाकपचे राज्य सहसचिव अ‍ॅड. कॉ. सुभाष लांडे, लालबावटाचे जनरल सेक्रेटरी अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, युनियनचे अध्यक्ष सतीश पवार, उपाध्यक्ष संजय कांबळे, विजय भोसले, अनिल फसले, सुभाष शिंदे, सुनील दळवी, राधाकिसन कांबळे, प्रभाताई पाचरणे, सुनीता जावळे, बबन भिंगारदिवे आदींसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------

मुंडे जयंतीनिमित्त वृक्षारोपण

अहमदनगर : लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पारिजात चौक ते बीएसएनएल कार्यालय रस्त्याच्या दुतर्फा १० फूट उंचीची झाडे लावण्यात आली. नगरसेवक रामदास आंधळे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका संगीता खरमाळे, मेजर शिवाजी पालवे, सुधीर पोटे, मदन पालवे, दीपक कावळे, राहुल आंधळे, कैलास गर्जे, दीपक कावळे, शिरीष जानवे, अभिजित चिप्पा, ऋग्वेद गंधे, संतोष हारेर, सुरेश सानप, पोपट पालवे, वैभव आव्हाड, हर्षल बांगर, स्वप्नील नांगरे, आनंद नाकाडे, आकाश सोनवणे आदींची उपस्थिती होती.