अहमदनगर : कोरोना काळात ज्या नाभिक सलून व्यवसायिकांच्या आत्महत्या झाल्या, त्यांच्या परिवाराला राज्य शासनाने १० लाख रुपये मदत द्यावी, यासह बारा बलुतेदार आर्थिक महामंडळाची स्थापना करून पाचशे कोटींचा निधी मिळावा, आदी मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रांत उपाध्यक्ष व बारा बलुतेदार महासंघाचे नगर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड यांनी आमदार अरुण जगताप यांना दिले.
यावेळी राजेंद्र पडोळे, अनिल इवळे, शाम औटी, बाबूराव दळवी, जलिंदर बोरुडे, सीताराम शिंदे, स्वप्नील नांदूरकर, मनोज खोडे, नंदकुमार आहिरे, संदीप वाघमारे, बबन कुसाळकर, मल्हारी गिते, संदीप घुले, जतीकार शेलार, संजय सैंदर, गोरख ताकपेरे, राहुल महामुने आदी उपस्थित होते. या निवेदनाची प्रत आमदार संग्राम जगताप यांनाही देण्यात आली. मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन आमदार जगताप यांनी दिले.