यावेळी उपायुक्त यशवंत डांगे, माजी नगरसेवक सचिन जाधव, ॲड. धनंजय जाधव, बाळासाहेब पवार, निखिल वारे, घनकचरा विभागाचे प्रमुख डॉ. शंकर शेडाळे, के. के. देशमुख, पी. एस. बिडकर व स्वच्छता निरीक्षक आदी उपस्थित होते. महापालिकेने बुरुडगाव येथे कोट्यवधी रुपये खर्च करून कचरा डेपो उभारला. कचऱ्या प्रक्रिया करण्यासाठी मशिनरी बसविण्यात आली आहे; परंतु तांत्रिक कर्मचारी नाहीत. याबाबत घुले यांनी प्रशासनाकडे विचारणा करत स्वच्छता विभागाची बैठक बोलविली. या बैठकीत घुले यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शहरातील संकलित केलेला कचरा भिजत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून, याबाबत काय उपाययोजना करणार, असा सवाल घुले यांनी उपस्थित केला. ओला व सुका कचरा वेगळा करण्याबाबत जनजागृती करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. यावेळी घंटागाड्यांचा विमा उतरविला नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणले. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. महापालिकेचा वजन काटा येत्या ३० जूनपासून कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
...
ट्रॅक्टर भाडेतत्त्वावर घेण्याची ती निविदा रद्द
स्वच्छता विभागाने मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावे, यासाठी गेल्या शुक्रवारी सायंकाळी ट्रॅक्टर भाडेतत्त्वावर घेण्याबाबतची नोटीस महापालिकेतील सूचना फलकावर लावली होती. शनिवार व रविवार दोन दिवस सुट्टी होती. सोमवारी दुपारी ११ वाजेपर्यंतच निविदा भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती. नियम डावलून राबविण्यात आलेली प्रक्रिया रद्द करण्याचा आदेश घुले यांनी दिला, तसेच ट्रॅक्टर भाडेतत्त्वावर न घेता पालिकेचे ट्रॅक्टर दुरुस्त करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.
..
सूचना: पाहणीचा फोटो आहे.