अहमदनगर : शिर्डी रोडवरील माऊली सेवा प्रतिष्ठानच्या मनगाव प्रकल्पासाठी बँक ऑफ इंडियाच्या वतीने सौर बंबाचे तीन संच देण्यात आले. बँक ऑफ इंडियाचे महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे जनरल मॅनेजर रमेशचंद्र ठाकूर यांनी हे संच माऊली सेवा प्रतिष्ठानचे डॉ. राजेंद्र धामणे यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी बँकेच्या पुणे विभागाचे झोनल मॅनेजर राजेश इंगळे, बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांच्या संघटनेचे अध्यक्ष सोनवणे, जनरल सेक्रेटरी बाबू मडूर, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष उल्हास देसाई, अहमदनगर शाखेचे व्यवस्थापक रवींद्र बुडमल उपस्थित होते. यावेळी ठाकूर यांनी माऊली सेवा प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, ईश्वराचा शोध घेताना माणूस देवधर्माच्या नावाखाली दानधर्म करतो. परंतु खरा ईश्वर माणसाच्या मनात आणि हृदयात असतो. त्याचा शोध माऊलीच्या रुग्णसेवेच्या कार्यात लागतो. बँक ऑफ इंडियाच्या वतीने यापुढेही मनगाव प्रकल्पासाठी वेळोवेळी शक्य ती मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. संस्थेच्या वतीने संस्थेचे पालक आबाजी पठारे यांनी त्यांचा सत्कार केला.
----
फोटो- ०३ माऊली
बँक ऑफ इंडियाच्या वतीने मनगाव प्रकल्पाला सौर संच देण्यात आला. यावेळी रमेशचंद्र ठाकूर, राजेश इंगळे, उल्हास देसाई, डॉ. राजेंद्र धामणे आदी.