शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

... तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:37 IST

कोपरगाव : गेल्या २५ वर्षांपासून मी एकच कायदेशीर व्यवसाय करतो आहे. मी विकत घेतलेली संपत्ती बाजार भावाप्रमाणे व शासकीय ...

कोपरगाव : गेल्या २५ वर्षांपासून मी एकच कायदेशीर व्यवसाय करतो आहे. मी विकत घेतलेली संपत्ती बाजार भावाप्रमाणे व शासकीय नियमानुसार व्यवहार करून घेतली आहे. आपल्या म्हणण्यानुसार कोल्हे परिवाराचे पैसे सांभाळण्याचे व हिशोब ठेवण्याचे काम करतो.

तर मग याच्याशीच निगडित २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीचा तुमचा आर्थिक लेखाजोखा मांडला तर तुम्हाला शहरात तोंड दाखवायला जागा राहणार नाही आणि तुमची इच्छाच असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकावर जाहीर सांगू शकतो, असे अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान यांनी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचा समाचार घेतला.

नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन भाजपा नेते पराग संधान यांच्यासह भाजप व शिवसेनेच्या काही नगरसेवकांवर व्यक्तिगत पातळीवर नावे घेऊन जाहीर टीका केली होती. त्याचे उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडून सोमवारी ( दि.१ मार्च ) भाजपा संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली.

संधान म्हणाले, सरकारी जागा बालवाडीच्या नावावर घेऊन बळकावणे, आरक्षण उठवून त्यात हिस्सा मागणे, भिशी चालविणे व छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी लकी ड्रॉ चालविणे हे धंदे कुणी केलेत हे शहरवासीयांना चांगलेच माहिती आहे. आता तुम्हाला जर माझ्या व्यवसायात यायचंच असेल तर तुमचे ‘वेलकम’ आहे.

उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे म्हणाले, गेल्या साडेचार वर्षात चुकीच्या कामांना मी नगराध्यक्षांना सभागृहात विरोध करीत असल्याने माझ्यावर आर्थिक व्यवहाराचे आरोप करून माझ्या बदनामीचे षडयंत्र करीत आहे. परंतु, त्याला मी भीक घालणार नाही.

......