शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

उपाशीपोटी झोपडपट्टीवाशीयांचा कोरानाशी लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:20 IST

अहमदनगर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत काही प्रमाणात का होईना; पण धान्य, फुड पॅकेट मिळत होते. दुसऱ्या लाटेत मात्र झोपडपट्टीवासीयांना ...

अहमदनगर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत काही प्रमाणात का होईना; पण धान्य, फुड पॅकेट मिळत होते. दुसऱ्या लाटेत मात्र झोपडपट्टीवासीयांना एका दमडीची सरकारी मदत तर नाहीच, उलटपक्षी झोपडपट्टीत गेल्या महिनाभरात कुणीही आरोग्य सेवक फिरकले नाहीत. रेशनची दुकानेही बंद असल्याने झोपडपट्टीवासीयांचा उपाशीपोटी कोरोनाशी लढा सुरू असल्याचे चित्र नगरमधील झोपडपट्टी भागात पाहायला मिळत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हातावर पोट असणाऱ्यांना सरकारने मोफत धान्य देण्याची घोषणा केली. तात्काळ धान्य वाटप करण्याचा आदेशही सरकारने दिले खरे; परंतु हे धान्य अद्याप झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरिबांपर्यंत पोहोचलेच नाही. कठोर निर्बंध लागून एक महिना उलटून गेला. मात्र, अजूनही रामवाडी परिसरासाठी असलेले रेशनचे दुकान बंद आहे. हाताला काम नाही, रोजंदारी बुडाली. कामावर निघालो तर पोलिसांचा धाक असतो. त्यामुळे कामावर जाण्याचा मार्गही बंद झाला आहे. घरातील मीठ-मिरची, धान्य, सगळे काही संपले आहे. त्यामुळे आता खायचे काय ? असा प्रश्न असतानाच कोरोनाशी सामना करण्यासाठी आरोग्याच्या कोणत्याही सुविधा नाहीत. सोशल डिस्टन्सिंग नाही. कोरोनाचा शिरकाव होतो आहे; पण सांगायचे कुणाला? दवाखान्यात जायचे तर पैसे नाहीत. घरात चिमुठभर धान्य नाही. तिथे उपचार कसे घेणार, यासह अनेक प्रश्न नगरमधील झोपडपट्टीवासीयांसमोर आहेत. कोरोनावरील लस घ्यायची तर नोंदणी करण्यासाठी मोबाइल नाही. काहींकडे आहे, पण तो हाताळता येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत.

.....

नगरमधील एकूण झोपडपट्ट्या- २२

घोषित झोपडपट्ट्या-१७

घोषित झोपडपट्ट्या-५

....

झोपडपट्टीतील कुटुंबांची संख्या

शासनाने २०१२ मध्ये शहरातील झोपडपट्टी सर्वेक्षण केले होते. त्यानुसार नगरमध्ये २२ झाेपडपट्ट्यांमध्ये ६५२ कुटुंबे वास्तव्यास होती. सध्या ही संख्या ८०० वर पोहोचली असून, या भागाची लोकसंख्या साधारण ५ हजार ५०० इतकी आहे.

.....

उज्ज्वला गॅस योजना गुंडाळली

शासनाने गोरगरिबांसाठी उज्ज्वला गॅस योजना आणली. मागीलवर्षी गॅसचे वितरण केले गेले; परंतु ही योजना ही बंद झाली आहे. नागिरकांना उज्ज्वला गॅसही मिळालेला नाही. त्यामुळे चुलीवरच स्वयंपाक करण्याची वेळ आली असून, लाकूड जमा करण्यासाठी बाहेर पडता येत नाही. त्यामुळे महिलांची गैरसोय होत आहे.

...

कचरा वेचकांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर

रामवाडी झोपडपट्टीतील १३५ महिला कचरा वेचण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत; परंतु महापालिकेने कठोर निर्बंध लागू केल्याने कचरा वेचण्याचे काम सध्या बंद आहे. हे काम बंद होऊन एक महिन्याचा कालावधी उलटून गेला. लॉकडाऊन नसताना महिलांना दीडशे ते दोनशे रुपये दररोज मिळत होते. त्यातून त्यांचे घर चालायचे; परंतु आता हे कामही बंद असल्याने घर कसे चालचायचे, असा प्रश्न कचरा वेचक महिलांसमोर आहे.

.....

कोविन ॲप म्हणजे काय रे भाऊ ?

कोरोनावरील लस घेण्यासाठी सरकारने कोविन ॲपवर नाव नोंदणी करणे बंधनकारक केले आहे; परंतु याबाबत झोपडपट्टीतील नागरिकांना काहीही माहिती नाही. काहींचा विचारले असता, हे ॲप काय आहे रे भाऊ, असे उत्तर मिळते. नोंदणी कशी करावी, स्लॉट बुकिंग कसा करायचा, ओटीपी कसा येतो, पिनकोड काय असतो, याबाबत आरोग्य विभागाकडून या भागातील नागरिकांना माहिती दिली गेली नाही. त्यामुळे लसीकरणाबाबत या भागातील नागरिकांमध्ये कमालीचे गैरसमज आहेत.

.....

कोरोनाच्या दुसऱ्या लोटेत काहीच मदत मिळाली नाही. सरकारने मोफत धान्याची घोषणा केली; परंतु रेशनची दुकाने बंद आहेत. काेरोनाबाबत कोणतेही सर्वेक्षण या भागात झाले नाही. लसीकरणासाठी नावनोंदणी करण्याबाबत नागिरकांना काहीही माहिती नाही. सरकारी यंत्रणेचे या भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

- विकास उडाणशिवे, सामाजिक कार्यकर्ता, रामवाडी

...

फोटो आहे