शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धटेकला ४०० केव्ही उपकेंद्र होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 18:36 IST

कर्जत तालुक्यातील सिध्दटेक (देऊळवाडी) येथे ४०० केव्ही उपकेंद्र मंजूर झाले आहे. या ३६८ कोटी रूपयांच्या कामांची निविदा प्रसिध्द झाली आहे.

सिध्दटेक: कर्जत तालुक्यातील सिध्दटेक (देऊळवाडी) येथे ४०० केव्ही उपकेंद्र मंजूर झाले आहे. या ३६८ कोटी रूपयांच्या कामांची निविदा प्रसिध्द झाली आहे.अहमदनगर जिल्ह्यात बाभळेश्वर येथे ४०० के. व्ही. उपकेंद्र आहे. या एका केंद्रावरच जिल्ह्यातील वीज वितरणाचा अतिरिक्त भार पडत होता. ही अडचण सोडविण्यासाठी आणखी एवढ्याच क्षमतेच्या उपकेंद्राची आवश्यकता होती. कर्जत तालुक्यातील सिद्धटेक (देऊळवाडी ) शिवारातील १७ हेक्टर सरकारी जमिनीवर हे उपकेंद्र उभे राहणार आहे. यासाठी ३६८.७२ कोटी रूपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी १९५.१५ कोटी रूपयांच्या कामांची निविदा तातडीने प्रसिद्ध झाली आहे. महाराष्ट् राज्य विद्युत पारेषण कंपनीकडे काम पूर्ण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आचारसंहितेच्या अगोदर भूमिपूजन अपेक्षित आहे. २४ महिन्यात काम पूर्ण होणार आहे.या उपकेंद्राचे स्थानिकांना फायदा मिळणार असून पूर्ण दाबाने वीज पुरवठा होणार आहे. तसेच औद्योगिकरणास चालना मिळून काही प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. ५०० एम.व्ही.ए. क्षमतेचे दोन रोहित्र बसविण्यात येणार आहे. औरंगाबाद-लोणी कंद यांना जोडणाऱ्या प्रवाहातून मुख्य वीज पुरवठा घेणार आहेत. या उपकेंद्रातून सुरूवातीस जेऊर (सोलापूर), भिगवण (पुणे), बेलवंडी भोसे (श्रीगोंदा) या उपकेंद्रांना विद्युत प्रवाह केला जाणार आहे. सुमारे ५० कर्मचारी कायमस्वरूप अपेक्षित आहेत. -कुंदन पवार, कार्यकारी अभियंता, प्रकल्प विभाग, महाराष्टÑ वीज पारेषण कंपनी, नाशिक-नगर. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर