शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिका उतरविणार श्रीरामपूरकरांचा जनविमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:27 IST

नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी अर्थसंकल्पीय भाषणात ५० लाख रुपयांचा जनविमा उतरविणार असल्याचे सांगितले. त्याचे सर्वांनी स्वागत केले. उपनगराध्यक्ष करण ...

नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी अर्थसंकल्पीय भाषणात ५० लाख रुपयांचा जनविमा उतरविणार असल्याचे सांगितले. त्याचे सर्वांनी स्वागत केले. उपनगराध्यक्ष करण ससाणे, श्रीनिवास बिहाणी, संजय फंड यांनी त्यात अडीच कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी सूचना केली. शहरातील ५० टक्के लोकसंख्येला (५० हजार) त्याचा लाभ होईल, असे ते म्हणाले. नगरसेवक राजेंद्र पवार, राजेश अलघ, भारती कांबळे, दिलीप नागरे, शामलिंग शिंदे या सर्वांनी त्याला संमती दिली. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यासाठी परवागी घ्यावी लागेल असे स्पष्ट केले.

दरम्यान, सभेत पालिकेच्या कर थकबाकीचा विषय ऐरणीवर आला. करवसुली केवळ ३० टक्क्यांवर खाली आली आहे. चार हजार लोकांकडे १५ कोटींची थकबाकी झाली आहे. त्यामुळे पालिकेचे उत्पन्न घटले असल्याचे यावेळी झालेल्या चर्चेतून समोर आले.

नगरसेवक अंजूम शेख यांनी खासदार गोविंदराव आदिक नाट्यगृह खुले होऊ शकले नाही, अशी खंत व्यक्त केली. पालिकेच्या शाळांमध्ये अद्यापही शौचालयांची व्यवस्था करता आली नाही, तसेच वाल्मीकी योजनेतील घलकुलांची पडझड झाल्याचे शेख म्हणाले.

----------

पुतळ्यांसाठी ७५ लाखांची तरतूद

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबडेकर तसेच इतर पुतळ्यांच्या उभारणीसाठी अर्थसंकल्पात ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. मात्र, त्याकरिता परवानगी मिळविता आलेली नाही. त्यामुळे या प्रश्नावर केवळ राजकारण केले जाते का, असा आरोप अंजूम शेख यांनी केला.

----------

शास्ती माफीची मागणी

शहरातील मालमत्ताधारकांकडून २५ टक्के व्याजाने शास्ती अकारली जात आहे. त्यामुळे पालिकेचे उत्पन्न बुडाले आहे. नागरिकांच्या घरपट्टीत भरमसाट वाढ झाली असून, करदात्यांना ती परवडणारी नाही, अशी टीका नगरसेवक राजेश अलघ यांनी केली.

----------