शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंदेकरांना आता मुबलक पाणी

By admin | Updated: April 22, 2016 00:13 IST

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात सध्या भीषण पाणी टंचाई आहे.

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात सध्या भीषण पाणी टंचाई आहे. त्यामुळे घोड धरणावरून आणलेल्या पाणी योजनेतून रोज २५ टँकरच्या मदतीने आठ ते दहा लाख लीटर पाणी शहर व परिसरातील वाड्या-वस्त्यांना पुरविले जाते. तसेच नवीन फिल्टर हाऊस ते जुन्या फिल्टर हाऊसपर्यंतच्या पाईपलाईनचे काम येत्या आठ दिवसात पूर्ण होऊन शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती नगराध्यक्ष छाया गोरे यांनी दिली.गोरे म्हणाल्या, शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याची जाणीव पालिका प्रशासनाला आहे.माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची भेट घेऊन वेळू तलावात कुकडीचे पाणी सोडण्याची विनंती केल. त्यामुळे वेळू तलावात पाणी सोडण्यात येणार आहे. तसेच घोड धरणावरून नवीन योजनेतून पाणी आणले आहे. हे पाणी सध्या नवीन फिल्टर हाऊसमध्ये आणले आहे. याठिकाणी शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी रोज २५ टँकर भरले जातात. यातून वाड्या-वस्त्यांना पाणी दिले जाते. सध्याच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नवीन फिल्टर हाऊस ते जुने फिल्टर हाऊस या दरम्यान पाईप लाईनचे काम चालू असून येत्या आठवडाभरात हे काम पूर्ण होऊन शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास गोरे यांनी व्यक्त केला. शहरातील सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी पालिका पदाधिकारी, नगरसेवक व अधिकारी प्रयत्नशील आहेत. टंचाईस्थितीमुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहनही गोरे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)