निघोज : पारनेर तालुक्यातील निघोज येथील २२ व्या वर्षी ८० म्हशींच्या गोठ्याचे उत्तम नियोजन करणाऱ्या श्रद्धा ढवणचा वडनेर बुद्रूकच्या ग्रामस्थांनी सन्मान केला.
श्रद्धाला या कामात तिचे दिव्यांग वडील, आई, भाऊ, बहीण यांचीही साथ मिळत आहे. महिंद्रा कंपनीचे आनंद महिंद्रा यांनी श्रद्धाच्या कष्टाची दखल घेऊन तिला दूध प्रक्रिया उद्योगासाठी फ्रिज भेट दिला. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आमदार रोहित पवार, आमदार निलेश लंके आदींनी तिच्या कामाचे कौतुक केले आहे.
यावेळी संजयदादा बाबर जनसेवा फाउंडेशन, निलेश लंके प्रतिष्ठानचे गणेश शेटे आदींसह पदधिकारी, उपसरपंच पूनम खुपटे, शोभा येवले, स्वाती लंके, धनश्री शेटे, श्रद्धा घोडे, रामदास भालेकर, ज्ञानेश्वर वाजे, किरण पडवळ, रोहित नऱ्हे, दत्ता थोरात, अजित नऱ्हे, श्रीकांत चौधरी यांच्यासह वडनेर बुद्रूकचे ग्रामस्थ उपस्थित होते.
----
आई, वडिलांना आत्मविश्वास दिला. तुम्ही सहकार्य करा. सर्व व्यवस्थापन मी करते. त्यांच्या सहकार्यानेच आज दुमजली बांधकामात ८० म्हशींचा गोठा बनवू शकले. राज्यभरातून अनेक फोन येतात. अनेकजण भेटी देतात. हे पाहून आई-वडिलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंदच माझे यश आहे, असे वाटते.
-श्रद्धा ढवण,
दूध उत्पादक, निघोज
--
०३ निघोज
निघोज येथील दूध उत्पादक श्रद्धा ढवणचा सन्मान करताना गणेश शेटे.