शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

मराठी गीतांवर जल्लोष

By admin | Updated: September 2, 2014 23:58 IST

उत्साहवर्धक वातावरणात संगमनेर फेस्टीवलचा तिसरा दिवस गाजला.

संगमनेर : क्षणाक्षणाला टाळ्यांचा कडकडाट... शिट्यांचा घुमणारा आवाज... गणपती बाप्पाच्या जयजयकारासह मराठमोळ्या गीतांवर होणारा जल्लोष... अशा उत्साहवर्धक वातावरणात संगमनेर फेस्टीवलचा तिसरा दिवस गाजला. राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूह आयोजित फेस्टीवलच्या तिसऱ्या दिवसाचा प्रारंभ शहरातील वास्तूविशारदांच्या हस्ते श्रींची आरती करून झाला. आजच्या नृत्य स्पर्धेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या ३८ संघांनी सहभाग नोंदविला. श्रीरामपूरच्या डी. जे. बॉईज संघाने बहारदार नृत्याविष्काराद्वारे सादर केलेल्या विविध कसरतींची प्रात्यक्षिके पाहून प्रेक्षक भारावून गेले. उत्कृष्ट वेशभूषा, साजेशी रंगछटा, परस्परांशी समन्वय, जलद व अचूक हालचाली, उत्कृष्ट पददालित्य अशा अष्टपैलू शैलीने सादर केलेल्या नृत्यास प्रथम क्रमांक मिळाला. या संघाला रोख ७ हजार व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. संगमनेर दंत महाविद्यालयाच्या संघाने बालकांच्या कुपोषणावर आधारीत संकल्पनेवर सामाजिक संदेश दिला.सादरीकरणात प्रत्येक स्पर्धक आपल्या भूमिकेशी समरस झाला होता. या संघास द्वितीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. संगमनेर महाविद्यालयाच्या कोमल फापाळे संघाने पारंपरिक नृत्यप्रकार सादर करून प्रेक्षकांची दाद मिळविली. या संघास तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. वर्णम नृत्य अकादमीचे भरतनाट्यम, बी बॉईज व डी. माक्स संघांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. उत्तम संकल्पनेचे प्रथम बक्षीस अहमदनगरच्या के.व्ही.एस, तर दुसरे बक्षीस स्टार अँगल अकादमीच्या संघाने पटकावले. उत्तम वेशभूषेसाठी ध्रुवच्या स्टार ग्रूप व नटरंग अकादमीने अनुक्रमे पहिले व दुसरे बक्षीस प्राप्त केले. स्वदेश प्रॉपर्टीचे संचालक बाळासाहेब देशमाने, नारायण अभंग, नवनीत कोठारी, श्रीनिवास भंडारी, संतोष करवा, सिध्दार्थ ओहरा यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. याप्रसंगी रोहित मणियार, सागर मणियार, संकेत कलंत्री, सुदर्शन नावंदर, गणेश मालाणी, सुरज डागा, राजेश मालपाणी, सचिन पलोड आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नेहा सराफ यांनी करून आभार मानले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरीकांनी प्रचंड गर्दी केली होती. (प्रतिनिधी)