शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नगर झेडपीत महाविकास आघाडीचा विखेंना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 17:24 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र येत भाजपचे माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांना मोठा धक्का दिला. जिल्ह्याच्या राजकारणातील किंगमेकर राधाकृष्ण विखे व शिवाजीराव कर्डिले हे दोन प्रमुख नेते सोबत असूनही भाजपाला जिल्हा परिषदेत सपशेल माघार घ्यावी लागली. भाजपसह विखे, कर्डिले आणि राम शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो.

अण्णा नवथरलोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र येत भाजपचे माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांना मोठा धक्का दिला. जिल्ह्याच्या राजकारणातील किंगमेकर राधाकृष्ण विखे व शिवाजीराव कर्डिले हे दोन प्रमुख नेते सोबत असूनही भाजपाला जिल्हा परिषदेत सपशेल माघार घ्यावी लागली. भाजपसह विखे, कर्डिले आणि राम शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो.राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे प्रमुख पक्ष एकत्र आले. त्याची पुनरावृत्ती नगर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झाली. जिल्हा परिषदेत काँग्रेस आघाडीची सत्ता होती. अध्यक्ष काँग्रेसकडे, तर उपाध्यक्ष पद राष्ट्रवादीकडे होते. आघाडीने पहिले अडीच वर्षे एकत्रित कारभार केला. भाजप अडीच वर्षे विरोधात होते. दरम्यानच्या काळात राधाकृष्ण विखे व डॉ. सुजय विखे हे विखे पिता-पुत्र भाजपवासी झाल्याने जिल्ह्यातील भाजपला बळ मिळाले. म्हणूनच विखेंच्या ताकदीवर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा भाजपाचा मनसुबा होता. भाजपने जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीची सूत्रे विखे यांच्याकडे सोपविली होती. विखे यांनी जिल्हा परिषदेत जुळवाजुळव करण्याचा प्रयत्नही केला. परंतु, पत्नी शालिनी विखे यांना अध्यक्ष करताना केलेला करिष्मा त्यांना यावेळी दाखविता आला नाही. विखे हे चमत्कार घडवतील, अशी अशा भाजपचे नेतेही बाळगून होते. पण, अखेरच्या क्षणापर्यंत त्यांना महाविकास आघाडीला आव्हान देता येईल, एवढे संख्याबळही जुळविता आले नाही. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि गडाख प्रणित क्रांतिकारी या प्रमुख पक्षाच्या नेत्यांची घट्ट पकड, यामुळे भाजपाला फोडाफोडीत यश आले नाही. महाविकास आघाडीतील काहींना गळाला लावण्याचा विखे यांच्यासह माजीमंत्री राम शिंदे आणि शिवाजीराव कर्डिले यांनी प्रयत्न केला. पण एकही पक्ष गळाला न लागल्याने ऐनवेळी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. भाजपची ही माघार महाविकास आघाडीला बळ देणारी असून, विखे यांच्यासह भाजपासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जाते. ....पराभवाला आमदारांतील नाराजीची किनारविधानसभेच्या निवडणुकीतील पराभवाचे खापर भाजपाच्या पराभूत आमदारांनी माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर फोडले. ही घटना ताजी असतानाच जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाल्याने या निवडणुकीतील पराभवाला आमदारांतील नाराजीचीही किनार असल्याचे बोलले जाते.