श्रीरामपूर : वडाळा महादेव येथील शिवा ट्रस्ट संचलित प्रतिभाताई पवार कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रीती सत्यजीत कदम, सुप्रिया सचिन ढुस, प्रिया कोठुळे, महानंदा कदम आदी उपस्थित होत्या.
महिला सबलीकरण व सशक्तीकरण, सुसंस्कृत महिला व आत्मनिर्भर महिला यावर प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. दीक्षा पवार या विद्यार्थिनीने पाहुण्यांचा परिचय करुन दिला. अनामिका धातांबले हिने स्त्री सुरक्षा तर ऋषिकेश सोनवणे हिने महिला सन्मान ही काळाची गरज या विषयावर मनोगत व्यक्त केले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार, प्रशासकीय अधिकारी किशोर जाधव व प्राचार्य डॉ. प्रद्युम्न इगे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा.मेघा साळवे, पल्लवी जाधव, स्नेहल गवारे, राजश्री खांडरे, करिश्मा गुळवे, मोहिनी माने, प्रा.ठाणगे तृप्ती, कांचन किर्तने, कोमल घाडगे व दीपावली सिनारे आदी उपस्थित होत्या. (वा.प्र.)
---------