शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

नगर तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:57 IST

केडगाव : नगर तालुक्यातील विविध भागात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जेऊरमध्ये संतुकनाथ सेवा मंडळ व अर्पण ब्लड ...

केडगाव : नगर तालुक्यातील विविध भागात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जेऊरमध्ये संतुकनाथ सेवा मंडळ व अर्पण ब्लड बँकेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सुनील पवार, गिरीश मगर, स्वप्निल तवले, सरपंच राजश्री मगर, उपसरपंच श्रीतेश पवार, इमामपूर सरपंच भिमराज मोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इमामपूर सरपंच भिमराज मोकाटे व जेऊर उपसरपंच श्रीतेश पवार यांनी रक्तदान केले. यावेळी माजी सरपंच मधुकर मगर, शरद नाना तवले, भाजप तालुका उपाध्यक्ष राजेंद्र दारकुंडे, संजय येवले, मधुकर पाटोळे, अविनाश तोडमल, गणेश आवारे, मनोज कोथिंबिरे, दिनेश बेल्हेकर, गणेश पवार, सुरज पवार, शरद तोडमल, मयुर तोडमल, अक्षय मोरे, शुभम पवार, बाबासाहेब मगर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

जेऊर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेविका सविता लांडे, सरपंच राजश्री मगर, उपसरपंच श्रीतेश पवार, सदस्य दिनेश बेल्हेकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच विकास कोथिंबिरे, अंकुश तवले, शिवाजी तवले, श्यामभाऊ विधाते, गणेश शिंदे, अण्णासाहेब मगर, आदिनाथ बनकर उपस्थित होते.

धनगरवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सतीश थोरवे, सुनील शिकारे, विजय रसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी किशोर शिकारे, विष्णू आढाव, अशोक विरकर, बाळासाहेब शिकारे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. इमामपूर येथे सरपंच भिमराज मोकाटे व ग्रामसेवक राहुल गांगर्डे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी सदस्य बाजीराव आवारे, शरद टिमकरे, दत्तात्रय म्हस्के, संदीप टिमकरे, नितीन आवारे, माजी उपसरपंच रावसाहेब आवारे, नवनाथ मोकाटे, कानिफनाथ मोकाटे, रोहिदास आवारे उपस्थित होते.

वाळकी, सारोळा कासार, चिचोंडी पाटील, निंबळक, भातोडी, रूईछत्तीसी, गुंडेगाव, डोंगरगण, निबोंडी, नागरदेवळे आदी ठिकाणी चौकाचौकात शिवजयंती उत्साहात व शांततेत पार पडली.

केडगाव जागरूक नागरिक मंचातर्फे शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी विशाल पाचारणे सुनील नांगरे, मंदार सटाणकर, शारदा शिरसाठ, अश्विनी पाचारणे, अतुल लवांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रविण पाटसकर, गणेश पाडळे, पूनम तानवडे यांनी केले.