शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
3
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
4
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
5
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
6
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
7
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
8
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
9
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
10
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
11
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
12
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
13
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
14
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
15
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
16
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
17
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
18
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
19
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
20
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीचे चार पोलीस निलंबित

By admin | Updated: April 2, 2016 00:34 IST

शिर्डी : गुरुवारी शिर्डी पोलीस ठाण्यात झालेल्या किरण रोकडे मृत्यू प्रकरणी शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले

शिर्डी : गुरुवारी शिर्डी पोलीस ठाण्यात झालेल्या किरण रोकडे मृत्यू प्रकरणी शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले तर पोलीस निरीक्षक वाघ यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली़गुरुवारी दुपारी किरण रोकडे या युवकाचा पोलीस ठाण्यात मृत्यू झाला होता़ किरणने कमरेच्या बेल्टने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले होते़ मात्र, किरणचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता़ किरणच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, या मागणीसाठी नातेवाईकांनी काही काळ रास्ता रोकोही केला होता़गुरुवारी सायंकाळी उशिरा पोलीस अधीक्षक त्रिपाठी यांनी शिर्डीला भेट देऊन माहिती घेतली़ सोमवारी त्रिपाठी यांनी ठाणे अंमलदार अयुब शेख, लॉकअप इन्चार्ज रज्जाक शेख, आऱ डी़ आव्हाड, एस़ बी़ माने या चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा तर शिर्डीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांची नियंत्रण कक्षात बदली करण्याचा आदेश काढला़ यानंतर काही वेळातच वाघ यांनी आपला पदभार सोडला़ तर जिल्हा विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांची शिर्डीला बदली करण्यात आली असून, त्यांनी सायंकाळी पदभार स्वीकारला़ (तालुका प्रतिनिधी)सीआयडीकडून तपास सुरू : दरम्यान, पोलीसच आरोपीच्या पिंजऱ्यात असल्याने निपक्ष व पारदर्शी चौकशी करण्यासाठी गुरुवारी रात्रीच हा तपास राज्य गुन्हे अन्वेषन (सीआयडी) विभागाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला़ शुक्रवारी या विभागाच्या अधीक्षकांनी शिर्डीला भेट देवून सर्व घटनेची बारकाईने माहिती घेतली़ त्यांनी रुग्णालयाला भेट देवून डॉक्टरांशीही चर्चा केली़पुण्यात शवविच्छेदन : किरणच्या मृत्युस पोलीस जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला असला तरी शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर किरणच्या मृत्युचे खरे कारण स्पष्ट होईल़ शुक्रवारी पुणे येथे डॉक्टरांच्या पथकाने किरणच्या देहाचे शवविच्छेदन केले. सायंकाळी पुण्याहून निघालेला मृतदेह रात्री उशीरा शिर्डीत येणार होता.