श्रीगोंदा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व अभिनेता रजनीकांत यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीगोंदा येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. स्वामी समर्थ ग्रामविकास प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसने तुळशिराम मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी ऑनलाइन पद्धतीने श्रीगोंदेकरांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, माजी आमदार राहुल जगताप, दीपक भोसले, शुभांगी पोटे, हरिदास शिर्के, मीनल भिंताडे, सीमा गोरे, संजय आनंदकर आदींची उपस्थिती होती. बाबासाहेब भोस यांनी आभार मानले. डॉ. उत्तम वडवकर यांच्या
रुग्णालयात राज देशमुख व सुशांत जवक मित्रमंडळाने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यावेळी माजी आ. राहुल जगताप, घनश्याम शेलार बाबासाहेब भोस, मनोहर पोटे, सतीश मखरे, नितीन डुबल आदींची उपस्थिती होती.
फोटो १२ श्रीगोंदा पवार
श्रीगोंदा येथे राज देशमुख व सुशांत जवक मित्रमंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास मान्यवरांनी भेट दिली.