शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच म्हणतात ‘गृहखाते’ नको शरद पवारांचे नगरमध्ये स्पष्टीकरण : मंत्रीपदावरून कोणी नाराज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 13:21 IST

अहमदनगर : महाआघाडीतील कोणत्याच पक्षात कोणीही मंत्रीपदावरून नाराज नाही. उलट मी अनेकांना गृहखाते हवे का, अशी विचारणा केली, परंतु कोणीच तयारी दर्शवली नाही. म्हणजे आमच्याकडे मंत्रिपद नको म्हणणारे अधिक आहेत. त्यामुळे नाराजीचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी मिश्किल टिपण्णी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरमध्ये केली. 

अहमदनगर : महाआघाडीतील कोणत्याच पक्षात कोणीही मंत्रीपदावरून नाराज नाही. उलट मी अनेकांना गृहखाते हवे का, अशी विचारणा केली, परंतु कोणीच तयारी दर्शवली नाही. म्हणजे आमच्याकडे मंत्रिपद नको म्हणणारे अधिक आहेत. त्यामुळे नाराजीचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी मिश्किल टिपण्णी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरमध्ये केली. जि. प.चे. माजी अध्यक्ष रामनाथ वाघ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पवार गुरूवारी सकाळी नगरमध्ये आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्र्यांचा शपथविधी झाला, परंतु खातेवाटपास विलंब होत असल्याबाबत विचारले असता, पवार म्हणाले, आज संध्याकाळी किंवा उद्या खातेवाटप पूर्ण होईल. खातेवाटप किंवा मंत्रीपदावरून सरकारमधील कोणत्याच पक्षात कोणीच नाराज नाही. हे सरकार तीन पक्षांचे असल्याने मंत्रीपदाचे वाटप सर्वांना करावे लागले, हे सर्वजण जाणतात. त्यामुळे कोणीही नाराज नाही. उलट आपण गृहमंत्री कोणाला हवे का? असे अनेकांना विचारले, परंतु कोणीच तयारी दर्शवली नाही. म्हणजे आमच्याकडे मंत्रीपद नको म्हणणारे लोक आहेत, अशी मिश्किल टिपण्णी त्यांनी केल्यानंतर उपस्थितांत हशा पिकला. गृहमंत्रीपदाबाबत बोलताना मात्र त्यांनी कोणत्याही पक्षाचे नाव घेतले नाही. नगरमध्येही ज्या तालुक्याला अद्याप मंत्रीपद नव्हते, त्या राहुरी तालुक्याला राष्ट्रवादीने प्राधान्य दिले, असे पवार म्हणाले. -------------महाआघाडीचे अनेक राज्यांतून स्वागत महाराष्ट्रात झालेल्या महाआघाडीच्या प्रयोगाचे इतर अनेक राज्यांनी स्वागत केले आहे. त्यादृष्टीने अनेक राज्यांतून आम्हाला विचारणाही झाली. त्यामुळे समान कार्यक्रम घेऊन जर प्रादेशिक पक्ष पुढे येणार असतील तर त्यांचे स्वागतच करायला हवे, असे सांगत पवार यांनी एकप्रकारे विरोधकांना इशाराच दिला.