शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

विजय औटी, ठुबे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

By admin | Updated: July 6, 2014 00:18 IST

पारनेर : शिवसेनेने विद्यमान आमदार विजय औटी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले असून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांची उमेदवारी जाहीर केली.

पारनेर : शिवसेनेने विद्यमान आमदार विजय औटी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले असून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांची उमेदवारी जाहीर केली. ठुबे यांच्या उमेदवारीने उत्सुकता वाढली आहे़ तर राष्ट्रवादी, काँगे्रस व मनसेमध्ये सध्या शांतता आहे.पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विजय औटी हे सध्या प्रतिनिधीत्व करीत आहेत़ मागील निवडणुकीत राष्ट्रवादीतील असंतुष्ट तसेच काँग्रेसच्या सहकार्याने व सर्वपक्षीयांची साथ लाभल्याने औटी विजयी झाले. आता पुन्हा शिवसेनेने औटी यांनाच उमेदवारी दिली असून मुंबईच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले़ शिवाय औटी यांना संगमनेर व अकोले या दोन विधानसभा मतदारसंघाचे पालकत्व देण्यात आले आहे़ त्यामुळे संगमनेर व अकोले येथील उमेदवार ठरविणे व कार्यकर्त्यांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी गावनिहाय शिवसेना शाखा सुरु करण्याचा धडाका लावला असून, प्रचाराचे नियोजन सुरु केले आहे़ दुसरीकडे त्यांच्यापासून दूर गेलेले जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बाबासाहेब तांबे यांना आता मनसेचा मार्ग निवडावा लागणार आहे.भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे औटींचा शिलेदारच त्यांच्या विरोधात रिंगणात उतरणार आहे. ठुबे यांच्या उमेदवारीचे कान्हूरपठार गटात स्वागत होत आहे.दोन्ही उमेदवार निश्चित झाले असताना काँगे्रस, राष्ट्रवादीत अद्यापही शांतता आहे. पारनेर मतदारसंघ सध्या राष्ट्रवादीकडे आहे़ त्यामुळे हा मतदारसंघ काँगेसकडे घेण्याबाबत खल सुरु आहे़ तर दुसरीकडे राष्ट्रवादीतील गटबाजी मिटण्याची चिन्हे नाहीत़ राष्ट्रवादीत इच्छुकांची मोठी यादी आहे़ त्यामुळे उमेदवारी जाहीर करताना आणि केल्यानंतर मोठा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे़ (तालुका प्रतिनिधी)