अहमदनगर : विमान म्हणजे लहान थोरांच्या आवडीचा आणि कुतूहलाचा विषय. घरावरुन विमान निघाल्याचा आवाज ऐकू आला की सर्वांची नजर आकाशाकडे भिरभिरते. हेच कुतूहल क्षमवण्यासाठी लोकमत व पी.बी.सी एरोहब महाराष्ट्रभर ‘एव्हिएशन सेक्टर अवेरनेस प्रोग्रॅम’ मोफत राबवित आहे. याच कार्यक्रमाच्या अंतर्गत नगरमधील निवडक शाळांमध्ये व्याख्यान व प्रात्यक्षिकांचे आयोजन केले आहे. उद्देश हाच की विद्यार्थ्यांमध्ये विमान अभियांत्रिकी व अवकाश यान तंत्रज्ञानाबाबत जागृती निर्माण करणे होय. बुधवारी (दि़२३) शहरातील विविध शाळांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला़ यामध्ये सेक्रेट हार्ड कॉन्हेन्ट इंग्लिश मिडीयम स्कूल, श्री बाणेश्वर विद्यालय बुऱ्हाणनगर, भिंगार हायस्कूल, नवीन मराठी शाळा, श्रीमती अॅबर्ट स्कुल, रयत शिक्षण संस्था, रेसिडेन्सिअल हायस्कूल येथे झालेल्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित उपस्थित होते़ मुख्याध्यापक वाकचौरे, दोडके सर, जगदाळे सर, जगताप सर, सिस्टर टॉयनेट, सौ. पाचंगे मॅडम सर्वांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. त्याचबरोबर गुरुवारी (दि़२४) आठरे पाटील शाळा, आनंद विद्यालय, श्री समर्थ विद्या मंदिर सावेडी, रेणावीकर विद्यालय आदी शाळांमध्ये प्रात्यक्षिक होणार आहे. फक्त शंभर रुपयांमध्ये कॅटॅपुल्ट व ३ पेपर प्लेन्सचा सेट उपलब्ध असून, अधिक माहितीसाठी लोकमत भवन, पत्रकार चौक, अ.नगर येथे लोकमत बालविकास मंच संयोजिका प्रियांका चिखले ९९६०५६९०६३ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे़
किती मौज आहे पहातरी.. विमान फिरते अधांतरी़़!
By admin | Updated: July 24, 2014 00:17 IST