शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

फुकटच्या ॲपमुळे शाळांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:26 IST

अहमदनगर : कोरोनामुळे सध्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गाचा आधार ठरत असला तरी हेच ऑनलाइन वर्ग विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. ऑनलाईन ...

अहमदनगर : कोरोनामुळे सध्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गाचा आधार ठरत असला तरी हेच ऑनलाइन वर्ग विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. ऑनलाईन क्लास सुरू असताना अश्लील मेसेज, व्हिडिओ अशा अनेक अनावश्यक वेबसाइट ओपन होत असल्याने विद्यार्थी विचलित होण्याचे प्रकार घडत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून शाळा ऑनलाईन सुरू आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरू असल्यामुळे पालकांना नाइलाजाने विद्यार्थ्यांना नवीन मोबाईल घेऊन द्यावे लागत आहेत. त्यामुळे पालकांचा आर्थिक खर्च वाढला आहे. सोबतच ऑनलाईन शिक्षणामुळे शाळांची, शिक्षकांची व पालकांची देखील डोकेदुखी वाढली आहे. कारण ऑनलाईन शिक्षण सुरू असताना इंटरनेट आवश्यक असते आणि कुठल्याही शैक्षणिक लिंकवर गेले असता, नको त्या जाहिरातीच्या लिंक, तसेच नको त्या अश्लील लिंक, चित्र, व्हिडिओ समोर येतात. विद्यार्थी कुतूहलापोटी व उत्सुकतेपोटी लिंकला छेडतात. कधी अनवधानाने, तर कधी मुद्दाम विद्यार्थी व्हिडिओ ग्रुपवर सेंड करतात. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना व शिक्षकांनाही त्याचा त्रास होतो. पालकांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेकदा कुतूहलापोटी विद्यार्थी हे व्हिडिओ पाहतात. त्यामुळे त्यांच्या बालमनावर वाईट परिणामही होत आहे.

-------------

शाळांनी घ्यावयाची काळजी...

ऑनलाईन वर्ग घेत असताना शिक्षकाला वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची ओळख असायला हवी. ऑनलाईन वर्गात खोड काढणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत चौकस असण्याची गरज आहे. शिक्षकांनी पाठविलेली लिंक विद्यार्थ्यांनी इतरांना पाठवू नये, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्याची गरज आहे. तसेच अशा अनावश्यक वेबसाइट ओपन झाल्या तर त्याकडे कसे दुर्लक्ष करायचे याबाबतही मार्गदर्शन हवे.

------------

पालकांनी घ्यावयाची काळजी...

ऑनलाईन क्लास सुरू असताना विद्यार्थी काय पाहतो आहे याकडे पालकांनी जरूर लक्ष द्यावे. शक्यतो मुलांची क्लासला बसण्याची जागा पालकांचे लक्ष असेल अशा ठिकाणी असावी. क्लास झाल्यानंतर मोबाईल तपासून पाहावा. मुलांचे चुकीच्या गोष्टीबाबत समुपदेशन करणे गरजेचे आहे. शक्यतो ऑनलाईन वर्गानंतर मुलांकडे मोबाईल देऊच नये.

-----------

सायबरतज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शाळा ज्या ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण घेते, त्या ॲप्सचे प्रीमियम व्हर्जन घ्यावे. कारण त्यात जास्त सुरक्षितता असते. ते ॲप्स हाताळण्यासाठी, त्यातील बारकावे शिक्षकांना अवगत करून देण्यासाठी त्यांची कार्यशाळा घेणे गरजेचे आहे, असे सायबरतज्ज्ञांचे म्हणणे आहे.