शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

खवले मांजर तस्करी करणारी टोळी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:20 IST

पुणे येथील वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक पवार, वनरक्षक मयूर बोठे यांना गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली. सातारा येथे दुर्मीळ ...

पुणे येथील वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक पवार, वनरक्षक मयूर बोठे यांना गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली. सातारा येथे दुर्मीळ खवले मांजराची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. तस्करी करणाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी जागा बदलून पुणे या ठिकाणी विक्री करण्याचे ठरवले. मात्र पुणे येथेही वनविभागाचे अधिकारी आपला पाठलाग करत असल्याचा तस्करांना संशय आल्याने विक्री स्थगित केली. हे तस्कर बोलेरो जीपमधून खवले मांजर घेऊन पुणे-नाशिक महामार्गाने संगमनेर तालुक्यातील खंदरमाळ शिवारात गेल्याचे वनविभागाला समजले. पुणे येथील वनअधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. घटनेची माहिती घारगाव वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी रामदास थेटे, सामाजिक कार्यकर्ते किशोर डोके, पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे हे वनविभागाच्या मदतीला धावले.

तस्कर नजर चुकवून डाळिंब शेतात पळाले. डोके यांनी मोबाइलवरून ग्रामस्थांना कळविले. रामनाथ कजबे, बाळासाहेब कजबे यांसह आदी ग्रामस्थांनी या तस्करांचा अर्धा किलोमीटरवर पाठलाग करून पकडले. तस्करांना वनविभागाच्या स्वाधीन केले. चौघांपैकी एकजण दुचाकी सोडून पळून गेला. दरम्यान,तीन जणांकडून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी खवले मांजर, बोलेरो जीप, एक मोबाइल, वाघनखे जप्त केले आहे. तस्करी करणारे तिघेजण पुणे वनविभागाने ताब्यात घेतले असून त्यांना पुणे येथे नेण्यात आले आहे. तस्करांची नावे मात्र समजू शकली नाही.