मंदिर बंदच्या निर्णयामुळे परिसरात शुकशुकाट दिसून येत होता. श्री क्षेत्र देवगडपाठोपाठ संत ज्ञानेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय संस्थानच्या वतीने घेण्यात आला असल्याची माहिती ह.भ.प. शिवाजी महाराज देशमुख यांनी दिली.
कोरोनाची महामारी रोखण्यासाठी व तिला प्रतिबंध घालण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवा, मास्क वापरा, घरात बसूनच माउलीची उपासना करा, आरोग्याची काळजी सर्वांनी घ्या. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार व परिसर बंद ठेवण्यात आला असल्याने संत ज्ञानेश्वर माउलींच्या दर्शनासाठी कोणीही येऊ नये, असे आवाहन संत ज्ञानेश्वर माउली मंदिराचे मुख्य मार्गदर्शक ह.भ.प. शिवाजी महाराज देशमुख, विश्वस्त पांडुरंग अभंग, अध्यक्ष माधवराव दरंदले, विश्वस्त विश्वासराव गडाख, रामभाऊ जगताप, ज्ञानेश्वर माउली शिंदे, भिकाजीराव जंगले, कृष्णाभाऊ पिसोटे, कैलास जाधव यांनी केले आहे.