शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेर तालुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:24 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेण्यात आली होती. प्रशासनाकडून १ हजार ८०० कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेण्यात आली होती. प्रशासनाकडून १ हजार ८०० कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पाच फेस शिल्ड, तीन मास्क, दोन हॅण्डग्लोजचे वितरण करण्यात आले होते. तसेच मतदानाच्या दिवशी सकाळी सहापासून ते मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी प्रा‌थमिक आरोग्य केंद्रातच थांबावे, असा आदेश तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल निकम यांनी काढला होता. मात्र, तालुक्यातील देवगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सकाळी अकराच्या सुमारास बंद असल्याने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना तहसीलदार निकम यांनी नोटीस बजावली.

...............

एक उमेदवार कोरोना पाॅझिटिव्ह

संगमनेर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या एका उमेदवाराला कोरोनाची लागण झाल्याचे कोरोना चाचणीतून समोर आले. या कोरोना पाॅझिटिव्ह उमेदवाराच्या विजयासाठी कार्यकर्तेच मेहनत घेत असल्याची चर्चा तालुक्यात चांगलीच रंगली होती.

..........

थोरात-विखे या दोन्ही गटांकडून विजयाचे दावे

संगमनेर तालुक्यातील २६ गावे शिर्डी विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली आहेत. या मतदारसंघातील १४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत शांततेत, उत्साहात मतदान पार पडले. मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. १४ गावांतील २८१ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व भाजपचे नेते, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा गावपातळीवर पणाला लागली आहे. १२ गावांच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत थोरात विरुद्ध विखे या दोन गटांत चुरस पाहायला मिळाली. या दोन्ही गटांच्या गावपातळीवरील स्थानिक नेते, कार्यकर्त्यांनी विजयाचे दावे केले.